उन्हाळ्यात लोकांना चेहऱ्यावर मुरुम, कोरडी निर्जीव त्वचा अशा अनेक समस्या होतात. त्याबरोबरच काही महिलांना चिकटपणाचा त्रास देखील होतो. अशा परिस्थितीत काकडीच्या वापराने त्वचा केवळ हायड्रेटच ठेवता येत नाही तर इतर अनेक समस्यांवरही मात करता येते. काकडीच्या आत अँटिऑक्सिडंट घटकांसह व्हिटॅमिन सी आढळते, जे त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊयात काकडीचे सेवन केल्याने कोणत्या समस्येवर मात करता
येईल...
- पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी काकडीचा खूप उपयोग होतो. तुम्ही काकडीचे नियमित सेवन करावे. यामुळे मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळेल.
- काकडी सुरकुत्यांच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. काकडीच्या आत अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळता. त्यामुळे काकडीच्या सेवनाने सुरकुत्यांपासून आराम मिळतो.
- काकडीचे सेवन केल्याने कोरड्या त्वचेपासून बचाव होतो. वास्तविक काकडीच्या आत जास्त प्रमाणात पाणी आढळते. अशा परिस्थितीत काकडीच्या सेवनाने त्वचा निरोगी ठेवता येते.
- काकडीच्या सेवनाने त्वचेचा चिकटपणा देखील दूर होतो. काकडीमध्ये पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असल्यामुळे त्वचेवरील चिकटपणाचा त्रास कमी होतो.
Tags:
Skincare