समर फॅशन टिप्स : उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रसंगानुसार कंफर्टेबल कपडे कसे निवडावे?


ऋतूनुसार फॅशनही वेळोवेळी बदलते. आता उन्हाळ्यानुसार फॅशन बदलू लागली आहे. प्रत्येक ऋतू विशेषतः मुलींसाठी खास असतो. अशात आज आम्ही तुम्हाला काही फॅशन टिप्स सांगणार आहोत. उन्हाळ्यानुसार काय घालावे आणि प्रसंगानुसार कपडे कसे निवडावे यासाठी काही खास टिप्स... 

 श्वेत रंग 

उन्हाळ्यात श्वेत रंगाचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा. या ऋतूत श्वेत रंगाला महत्त्व असते. कारण तीव्र सूर्यप्रकाशात श्वेत रंगामुळे थंडावा मिळतो. तुम्ही पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, लखनवी सूट, अनारकली, साडी, शर्ट, पेन्सिल स्कर्ट, ट्राउझर्स इत्यादी ट्राय करू शकता.

प्रिंट

उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंटला अधिक पसंती दिली जाते. पावसाळ्यात ही प्रिंट आवडत असली तरी उन्हाळ्यात हलक्या रंगाची फ्लोरल प्रिंट मस्त लुक देते. फ्लोरल व्यतिरिक्त चेक, स्ट्राइप्स, जॉमेट्रिक प्रिंट्सही ट्राय करता येतील.

कंफर्टनेस 

उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्यामुळे टाईट कपडे टाळण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत कंफर्टेबल कपडे परिधान केल्याने आराम मिळेल. शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, कॉटन टी-शर्ट, प्लाझो , लांब कुर्त्या, प्लीटेड स्कर्ट, पांढरा शर्ट किंवा लिनेन जॅकेट, कॉटन साड्या हे उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

पार्टी लुक


पार्टीमध्ये अनेकदा काळ्या रंगाला प्राधान्य दिले जात असले तरी उन्हाळ्यात तुम्हाला काही वेगळे रंग ट्राय करता येतील. यामध्ये तुम्ही गोल्ड किंवा सिल्व्हर कलर देखील ट्राय करू शकता. संध्याकाळच्या पार्टीसाठी तुम्ही शिफॉन, जॉर्जेट रॉ सिल्क वन शोल्डर, ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस किंवा मॅक्सी ड्रेस देखील घालू शकता.

वेडिंग लूक

उन्हाळ्यात लग्नसमारंभात हेवी ड्रेस आणि गडद रंगाचे कपडे घालणे थोडे कठीण असते. त्यामुळे या काळात गोल्ड-सिल्वरबरोबर ऑलिव्ह ग्रीन, पिंक, पीच असे पेस्टल रंग घालू शकता. अनारकली ड्रेस, लेहेंगा-चोली, ट्रेडिशनल गाऊन किंवा साडी या रंगांमध्ये घालता येईल. 

Previous Post Next Post