उन्हाळ्यात अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून घरगुती टिप्स...

उन्हाळ्यामध्ये जवळपास प्रत्येकालाच अंगाला घाम येण्याची समस्या होते. काही वेळा घामामुळे दुर्गंधी देखील येते. त्यामुळे इतरांसमोर अनेकदा आपल्याला लाजिरवाणे वाटू शकते. ही समस्या होऊ नये म्हणून काही घरगुती टिप्स फॉलो करून बघा... 

गुलाब जल-
जर तुम्हाला अंडर आर्ममध्ये घाम येत असेल तर तुम्ही त्या भागात गुलाब जलचा स्प्रे मारू शकता. तसेच ज्या पाण्याचा तुम्ही आंघोळीसाठी वापर करता त्या जलमध्ये देखील तुम्ही गुलाब जल मिक्स करू शकता.

लिंबू-

शरीराच्या ज्या भागाला जास्त घाम येतो, त्या भागावर लिंबूची फोड चिरून फिरवा. दहा मिनिट लिंबूची फोड  फिरवल्याने घामाचा वास येणार नाही.  

कोरफड जेल

रात्री झोपण्याआधी अंडर आर्मला किंवा मानेच्या खालच्या बाजुला कोरफड जेल लावा. त्यानंतर सकाळी थंड पाण्याने धून घ्या. 

तुरटी

तुरटीमध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. अंघोळ झाल्यानंतर तीन किंवा चार मिनिटांनी शरीराच्या ज्या भागात घाम येतो अशा भागात तुरटी फिरवा. त्यामुळे शरीरावरील बॅक्टेरिया नष्ट होतात.