नखांना द्या हटके लुक, बघा फ्रेंच नेल टिप्स आर्टचे विविध प्रकार

नेल आर्ट करणाऱ्या व्यक्तीसाठी सुंदर डिझाइन केलेल्या फ्रेंच टिप नखांपेक्षा अधिक फॅशनेबल काय असू शकते? फ्रेंच मॅनिक्युअर क्लासिक आहे. इतर प्रकारचे मॅनिक्युअर ट्रेंडी असले तरी फ्रेंच मॅनिक्युअरला मागे टाकू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात फ्रेंच नेल टिप्सचे विविध प्रकार... 

कलरफुल फ्रेंच टीप 


कलरफुल फ्रेंच टिप्स करण्यासाठी तुम्ही
 रॉयल ब्लु, हॉट पिंक, वाईल्ड ग्रीन, डार्क रेड यांसारख्या कोणत्याही चमकदार रंगांची निवड करा किंवा या रंगांच्या फक्त सूक्ष्म छटा बनवा. जे तुमच्या नेल टिप्सना नाजूक वळणासह क्लासिक लुक देईल. जर तुम्हाला हटके नेल टिप्स हव्या असतील तर त्यांना निऑन पेंट करा. तुम्ही केवळ एका नखाला डिझाईन करून इतर सर्व नेलं टिप्सना श्वेत रंग द्या.  

रिव्हर्स फ्रेंच टीप


ही एक शैली आहे ज्यामध्ये फ्रेंच टिप्स उलट्या पद्धतीने नखांवर डिझाईन केले जातात.
 यासाठी तुम्हाला नखाच्या मागच्या बाजूला हाफ मून तयार करावा लागेल. त्यामुळे याला ‘हाफ मून मॅनिक्युअर’ असेही म्हणतात. तुमच्या कपड्यांशी जुळणाऱ्या शेड्स वापरून हाफ-मून तयार करा. यामुळे तुमची नखे सुपर ट्रेंडी दिसतील. 

जॉमेट्रिकल फ्रेंच टिप्स


जॉमेट्री आवडते? मग, तुम्हाला या मजेदार फ्रेंच टिप्स देखील आवडतील. यामध्ये वेगवेगळ्या शेड्सने दोन लाईन्स बनवून नेलटीप्स डिझाईन करतात. परफेक्ट डिझाईन बनवण्यासाठी टेपच्या बारीक स्ट्रीप कापून ते नखांवर लावा आणि त्यावरून डिझाईन करा. 

स्टॅम्पड फ्रेंच टिप्स 


जेव्हा एक अद्वितीय फ्रेंच नेल टिप डिझाइन करण्याचा विचार येतो तेव्हा, निःसंशय
 स्टॅम्पिंग हा एक उत्तम पर्याय मानला जातो. बाजारात अनेक आकर्षक स्टॅम्पिंग डिझाईन्स उपलब्ध आहेत. स्टॅम्प डिझाईन झाल्यानंतर त्यावर शाईनरचा किंवा ट्रान्सपरंट ग्लिटरचा टॉप कोट लावायला विसरू नका. 

शिमरी फ्रेंच टिप्स 


फेस्टिव्ह सीझनसाठी नवी
 नेल आर्ट डिझाईन शोधताय. त्यासाठी शिमरी फ्रेंच टिप्स हा उत्तम पर्याय आहे. ट्रान्सपरंट नेलपेंटचा एक कोट लावून घ्या. त्यावर गोल्ड, सिल्वर, ब्लु इ. रंगाचे ग्लिटर्स लावा. या डिझाईनसह तुमच्या नेलटिप्सना फेस्टिव्ह सीझनमध्ये हटके आणि ट्रेंडी लुक मिळेल       

  

Previous Post Next Post