फेशियल फॅट कमी करण्यासाठी परिणामकारक एक्सरसाइज

फेशियल फॅट तुमच्या रेखीव चेहऱ्यावरील सौंदर्य कमी करतो. चेहऱ्यावरील चरबी कमी करणे, तुमचे सौंदर्य अधिक आकर्षक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्र-परिवारामध्ये सेल्फी काढताना तुमच्या डबल चीनमुळे अनेकदा तुम्हाला कमीपणा वाटतो. हा कमीपणा येऊ नये म्हणून फेशियल फॅट कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे काही महत्त्वाच्या एक्सरसाइज करा... 

बलून पोज 

हा फेस योगा नियमितपणे केल्याने तुमच्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते. 

बलून पोज कसे करावे? 

बलून पोझ करण्यासाठी, प्रथम चटई घाला. आता चटईवर सरळ बसा. या दरम्यान तुमचा चेहरा सरळ असावा. यानंतर तोंडात हवा भरा आणि ओठ बंद करा. तुमचे तोंड फुग्यासारखे दिसेल. त्यानंतर दोन्ही बोटे ओठांवर ठेवा. यामुळे तुमच्या तोंडातील हवा थांबण्यास मदत होईल. थोडा वेळ असाच रहा. त्यानंतर सामान्य स्थितीत परत या.

फेस टॅपिंग पोज



हे आसन रोज केल्याने तुमची त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते. हा व्यायाम तुमच्या चेहऱ्यावरील रक्त प्रवाह सुधारण्यास देखील मदत करतो. हे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

फेस टॅपिंग पोज कसे करावे?

 हे आसन करण्यासाठी जमिनीवर सरळ बसा आणि चेहरा सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यानंतर दोन्ही हात चेहऱ्यासमोर आणा. त्यानंतर बोटांनी सतत चेहऱ्याला थोपटत राहा. चेहऱ्यापासून मानेपर्यंत टॅप करा.  काही काळ असे करत राहा. मग सामान्य स्थितीत या.

फिश पोज 


जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर तुम्ही हा व्यायाम करावा. यामुळे विशेषतः गालावरील आणि जॉ लाईनवरील चरबी कमी होते, ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक आकारात दिसतो. एवढेच नाही तर या फिश पोझमुळे  डबल चीनदेखील
 बरी होऊ शकते. 

फिश पोज कसे करावे?

 फेस टॅपिंग पोझ केल्यानंतर, फिश पोज करण्यासाठी पुन्हा सरळ बसा. लक्षात ठेवा की तुमची मान आणि चेहरा सरळ असावा. यानंतर तुमचे दोन्ही गाल आतून चिमटीत करा. यामुळे तुमचा चेहरा माशासारखा दिसेल. आता या आसनात राहून आपला चेहरा आकाशाकडे वळवा. त्यानंतर काही काळ याच अवस्थेत राहा. मग आपण सामान्य स्थितीत परत या.

Previous Post Next Post