कॉस्मेटिक जगात काही नवीन ट्रेंड येणे, मुली आणि महिलांसाठी खूप एक्साइटिंग असते. सध्या कॉस्मेटिक विश्वात एक नवीन ट्रेंड लोकप्रिय होतोय, ज्याला Blue Skincare ट्रेंड म्हणून संबोधले जात आहे. होय, सध्या सोशल मीडियावर #BlueBeauty आणि #Blueskincare हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एवढेच नाही तर, हा स्किनकेयर विश्वातील पुढील सर्वात मोठा ट्रेंड मानला जात आहे. आता तुम्हाला ब्लु स्किनकेयर म्हणजे काय? या स्किनकेयर ट्रेंडमध्ये नक्की काय विशेष असते? असे अनेक प्रश्न पडत असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Blue Skincare म्हणजे काय?
Also Read: Hollywood celebrites skincare routine to get glowing and glossy skin
Blue Skincare म्हणजे काय?
ब्लु स्किनकेयरमध्ये ब्लु टेन्शन रिलिविंग, कूलिंग आणि हीलिंग घटक आढळतात. याचे रंग सामान्यतः ब्लु ट्रान्सपरंट असतो. ब्लु स्किनकेयर गर्मी आणि पावसाळ्यात उपयुक्त आहे. कारण यासह स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्किनकेयरमध्ये जे प्रोडक्ट्स येतात, त्यात प्रामुख्याने सागरी घटक असतात. या घटकांमध्ये ब्लू टॅन्सी ऑइल, ब्लू अझुलीन, सी वीड, निलोत्पल आणि ब्लू कॅमोमाइल समाविष्ट आहेत.
कुणासाठी आहे Blue Skincare?
ब्लु स्किनकेयर विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांची त्वचा सेंसेटिव्ह, डिहायड्रेटेड किंवा इन्फ्लेम्ड (सुजलेली) आहे. याशिवाय, नैसर्गिक आणि थंड प्रभाव असलेल्या त्वचेच्या प्रोडक्ट्सच्या शोधात असलेल्या लोकांसाठी ब्लु स्किनकेयर परिपूर्ण मानली जाते. यासोबतच, ज्यांच्या त्वचेला प्रदूषण आणि उष्णतेमुळे त्रास होते, त्यांच्यासाठी ब्लु स्किनकेयर उपयुक्त आहे, असे बोलले जाते. ब्लु स्किनकेयर मध्ये तुम्हाला ब्लू टॅन्सी फेस ऑइल, ब्लू लोटस हायड्रेटिंग मास्क, मरीन ब्लू जेल मॉइश्चरायझर आणि सी मिनरल्स फेस मिस्ट इ. प्रोडक्ट्स मिळतील.
Blue Skincare बेनिफिट्स
ब्लु स्किनकेयरच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यासह तुम्हाला त्वचेवरील लालसरपणा आणि रॅशेसपासून सुटका मिळेल. ब्लु स्किनकेयर सेन्सिटिव्ह आणि मुरूम असलेल्या त्वचेसाठी परफेक्ट आहे. यासह, ब्लु स्किनकेयर तुमच्या त्वचेला ग्लोइंग आणि फ्रेश करेल.
महत्त्वाचे
जर तुम्ही देखील ब्लु स्किकेयर घेण्याचा विचार करत असाल तर ब्लु स्किनकेयर प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी यात नैसर्गिक घटक आहेत की नाही, हे नक्की तपासून घ्या. केमिकल फ्री प्रोडक्ट्स वापरणे, तुमच्या त्वचेच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, कोणतेही नवीन प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे अत्यंत महत्वाचे आहे.
डिस्क्लेमर: वरील सर्व माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लक्षात घ्या की, सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्या लोकांनी काहीही वापरण्यापूर्वी नेहमीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
image credit: ADOBE STOCK

