उन्हाळा हा असा एक ऋतु आहे जो फॅशन आणि ट्रेंड्सच्या बाबतीत परफेक्ट ऋतू आहे. कारण या ऋतूमध्ये प्रत्येकाजवळ स्वतःला स्टायलिश दाखवण्यासाठी बऱ्याच चॉइसेस असतात. कारण हिवाळ्यात किंवा वर्षा ऋतूमध्ये आपले ट्रेंडी आऊटफिट्स जॅकेट किंवा रेनकोटमध्ये लपले जातात. म्हणून उन्हाळा फॅशन आणि ट्रेंड करता परफेक्ट ऋतु मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात 'समर लेटेस्ट ट्रेंड्स'बद्दल जे तुम्हाला देतील परफेक्ट लुक...
- बॅगी लिनेन ट्राऊझर्स सोबत प्लेन लिनेन शर्ट आजचे लेटेस्ट ट्रेंड आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याच्या योजनेत असाल तर ही पेअर तुमच्या बॅगेत ठेवायला विसरू नका. ही पेअर तुम्हाला कूल आणि स्टयलिश लुक देणार.
- मागील काही वर्षांमध्ये जंपसूट सतत ट्रेंडमध्ये आहे. मुलींबरोबर आजकाल मुलांचे देखील जंपसूट बाजारात उपलब्ध आहेत. जंपसूट कॅरी केल्याने तुम्हाला सेक्सी आणि हॉट लुक मिळेल.
- कंफर्टेबल आऊटफिट हवे असल्यास टी-शर्ट शिवाय उत्तम कुठलाही पर्याय नाही. ब्लु डेनिम आणि स्नीकर्ससोबत शुभ्र, पिवळा किंवा हलक्या गुलाबी रंगाची टी-शर्ट उन्हाळ्यासाठी बेस्ट आऊटफिट आहे.
- ज्या मुलांची बॉडी खूप जबरदस्त आहे आणि त्यांना आपले लुक सर्वांसमक्ष आणायचे असल्यास त्यांनी समर- फ्रेंडली जॅकेट नक्की ट्राय करावा. ही जॅकेट डेनिम किंवा स्नीकर्स सोबत घालून स्वतःला एक हट्टके लुक द्या.
- क्लोट्स गुडघ्यापेक्षा लांब असतात. हलके,ढिले असल्यामुळे क्लोट्स आरामदायक असतात. क्लोट्स तुम्ही क्रॉप-टॉप सोबत घालू शकता. कूल लुकसह यात तुम्हाला भरपूर कंफर्टेबलसुद्धा वाटेल.
- जर तुम्हाला स्वतःला स्टायलिश लुक द्यायचे असेल तर तुम्ही हाफ हॉल्टर नेक टॉप घालू शकता. जीन्स सोबत हे टॉप जितके सुंदर दिसतात, तितकेच स्टायलिश स्कर्ट्सबरोबर सुद्धा दिसतात. ऑफिसशिवाय हँगआऊटसाठी किंवा पार्टीजमध्ये देखील तुम्ही हे टॉप कॅरी करू शकता. मात्र या बरोबर मोकळा गळा जास्त ट्रेंडी दिसतो. म्हणून या टॉपसह गळ्यात काहीही घालू नका.