हिवाळा म्हणजे खाण्याचा सीजन असतो, कारण यावेळी अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि इतर फळभाज्या येतात. त्यामुळे हिवाळ्यात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पदार्थ तयार होत असतात. तसेच, थंडीमुळे आळस देखील येतो. अशा परिस्थितीत वजन वाढण्याची तक्रार बरेच लोक करत असतात. खरं तर, या ऋतूत येणार आळस आणि तळलेले, मसालेदार आणि गोड पदार्थांचे सेवन वजन वाढण्याला कारणीभूत असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचे शरीर उबदार राहीलच पण त्यासह तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील.
हिरव्या पालेभाज्या
हिवाळ्यात अनेक प्रकारच्या पौष्टिक पालेभाज्या येतात. यात पालक, मोहरी, मेथी, बथुआ, हरभरा आणि सोयाबीन अशा विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या उबदार भाज्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि यात कॅलरीज कमी असतात. कारण या भाज्या शिजवताना जास्त तेल किंवा मसाल्यांचा वापर होत नाही. म्हणून हिवाळ्यात तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, आवश्यक आहे.
हळदीचे दूध
हिवाळ्यात तुमच्या आहारात हळदीचे दूध समाविष्ट करावे. त्यात थोड्या प्रमाणात काळ्या मिरीचा वापर करा, जी कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि चरबी कमी करण्याचे कार्य करते. हळदीचे दूध मुलांपासून प्रौढ लोकांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय, हे दूध तुम्हाला रात्री चांगली झोप घेण्यास देखील मदत करेल. हिवाळ्यातील सामान्य समस्या वेदना, सर्दी आणि खोकल्यापासून देखील तुम्ही सुरक्षित राहाल.
नट्स आणि सीड्स
शरीराला ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी प्रोटिन्सची आवश्यकता असते. यासाठी तुमच्या आहारात विविध प्रकारचे काजू, विशेषतः बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करा. याव्यतिरिक्त, तुमच्या आहारात काही बियांचा देखील समावेश करा. सीड्स प्रोटिन्स आणि चांगल्या चरबीचे स्रोत आहेत, जे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात.
ग्रीन टी
ग्रीन टी हे हिवाळ्यातील घेतले जाणारे प्रसिद्ध पेय आहे, जे तुम्हाला आरामदायी वातावरण आणि उब देते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी मानली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्रीन टी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. म्हणून तुम्ही हिवाळ्यात नॉर्मल टी ग्रीन टीसह एक्सचेंज करू शकता.
आले
आले देखील चरबी कमी करण्यास आणि शरीराला उबदार ठेवण्यास उपयुक्त मानले जाते. आले हिवाळ्यातील अनेक आरोग्य समस्यांपासून आराम देऊ शकते. जसे की सर्दी, खोकला, सूज आणि स्नायू कडक होणे. आल्याचा चहा तणाव कमी करण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो.
image credit: pexels