मित्र-मैत्रिणींसोबत ट्रिपला म्हणजेच फिरायला जाणे प्रत्येकाच्या आयुष्यातले अमूल्य क्षण असतात. ती प्रेमळ वादावादी, ते कुणालाही दबावात न येता हवे तसे एन्जॉय करणे, वेगवेगळी ठिकाणे रुसव्याफुगव्यांशिवाय एक्सप्लोअर करणे इ. सर्व गोष्टी मित्रमैत्रिणींसह असलेल्या ट्रिपला एकदम परफेक्ट बनवतात. आजकाल मुली-मुली लांब दूरवर फिरायला जाण्याचे ट्रेंड सुरु झाले आहे. मुली-मुलींमध्ये कुठल्याही प्रकारचा अवघडलेली परिस्थिती जाणवत नाही. मुलींसाठी, मैत्रिणींसोबत प्रवास करणे, ही खरं तर एक मेजवानी असते. आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजही अनेक घरांमध्ये, मुलींना क्वचितच एकटे प्रवास करण्याची परवानगी दिली जाते, कारण कुटुंबे सुरक्षिततेबद्दल चिंतीत असतात.
Also Read: कमी बजेटमध्ये मस्त पर्वतांवर फिरायला जायचंय? 'या' ठिकाणी अनुभवायला मिळेल स्वर्ग
प्रवास करताना खबरदारी घ्या.
जर तुम्ही सहलीला जात असाल तर दिवसा प्रवास करणे अधिक सुरक्षित असते. जर तुम्हाला एखादे विशिष्ट ठिकाण पहायचे असेल तर, रात्री गर्दी असलेल्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कॅब बुक करायची असेल तर वेरिफाइड ऍप वापरणे योग्य राहील. तुमचे स्थान कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कुठेही प्रवास करत असाल तर तुमच्या हॉटेलचे नाव आणि पत्ता लिहून ठेवा.
'या' गोष्टी सोबत आणायला विसरू नका.
तुम्ही एक छोटी डायरी आणि पेन सोबत ठेवावे. तसेच, हॉटेल कार्ड, ID प्रूफ इ. महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवावीत. तसेच, तुमच्या फोनची बॅटरी फुल चार्ज ठेवा आणि पॉवर बँक सोबत आहे की नाही, याबद्दल खात्री करा. काही प्रमाणात तुमच्यासह कॅश असणे आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी, पेपर स्प्रे आणि सेफ्टी पिन सारख्या काही वस्तू तुमच्यासोबत पाहिजेत. मौलयवान दागिने सोबत नेणे टाळा.
सतर्क राहणे महत्वाचे आहे.
तुमच्या गट फीलिंगवर विश्वास ठेवणे अधिक महत्वाचे आहे. जर एखादे ठिकाण योग्य वाटत नसेल, तर ताबडतोब तिथून निघून जाणे उत्तम ठरेल. उत्साहात तुमच्या आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला काही संशयास्पद दिसले तर आधीच लांब व्हा आणि दिल्या जाणाऱ्या ड्रिंक्सकडे विशेष लक्ष द्या.
सर्वात महत्त्वाचे
ट्रिपला गेल्यावर हॉटेल रूम्समध्ये कपडे बदलताना आणि आंघोळ करताना तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. खरं तर, असे अनेक प्रसंग आहेत जिथे हिडन कॅमेरे असतात. तुम्ही तुमच्या फोनचा फ्लॅशलाइट सुरु करून हे तपासू शकता. शिवाय, कपडे बदलताना लाईट बंद करणे, हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे कोणतीही ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
इमर्जन्सी नंबर्स
तुम्ही ज्या ठिकाणी भेट देत आहात त्या ठिकाणाचे इमर्जन्सी नंबर्स जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला कठीण परिस्थितीत देखील मदत मिळू शकेल. हे नंबर्स फक्त तुमच्या फोनवरच नाही तर स्वतंत्रपणे डायरीमध्ये देखील लिहून ठेवा. स्थानिक प्रशासनाकडून तुम्हाला त्यांची माहिती मिळू शकते.