4-2-4 Skincare Routine: ट्रेंडी स्किनकेअर रुटीन रुल, नक्की काय विशेष? त्वचेसाठी ठरतोय खास


4-2-4 Skincare Routine: मुली ग्लोइंग आणि स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी अनेक स्किनकेयर रुटीन अमलात आणल्या जातात, परंतु कधीकधी हवे तसे इच्छित परिणाम साध्य होत नाहीत. त्यात सध्या एका नवीन स्किनकेयर रुटीन ट्रेंड होत आहे. याला 4-2-4 स्किनकेयर रुटीन रुल असे म्हणतात. तुमच्या त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी, हायड्रेट करण्यासाठी आणि एकूणच पोषण देण्यासाठी हे रुटीन डिझाइन करण्यात आले आहे. हे रुल फॉलो करून तुम्ही तुमचे स्किनकेयर रुटीन सुधारू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 4-2-4 रुटीन रुलबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर समजेल. 

संतुलित आहार राखण्यासोबतच, निरोगी त्वचा राखण्यासाठी योग्य बाह्य काळजी देखील आवश्यक आहे. या रुटीनचे नियमित पालन करणे आवश्यक आहे. 4-2-4 स्किनकेयर रुटीन हा असाच एक रुल आहे, जो दीर्घकालीन त्वचेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून त्वचेची काळजी घेणाऱ्या मुलींनी त्याचे पालन करावे.

4-2-4 Skincare Routine

ही तीन स्टेपची स्किनकेअर पद्धत आहे, जी त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यावर आणि हायड्रेट करण्यावर लक्ष केंद्रित करते. ज्यामध्ये ऑइल क्लिंजिंग करणे, लाईट फोम किंवा फक्त पाण्याने त्वचा स्वच्छ करणे समाविष्ट आहे. ही रुटीन जरी लिचक लचक वाटत असेल, तरी ते त्वचेतील अशुद्धता खोलवर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. हे तुमच्या त्वचेचे अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

स्टेप 1  

सर्वप्रथम ऑइल बेस्ड क्लीन्सरने तुमच्या त्वचेला मसाज करा. सनस्क्रीन, मेकअप आणि एक्सट्रा सिबम सारख्या तेलात विरघळणाऱ्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी ही स्टेप आवश्यक आहे. ही स्टेप पूर्ण 4 मिनिटे फॉलो करा, म्हणजे तुम्हाला 4 मिनिटे मसाज करावे लागेल. यामध्ये ऑइल बेस्ड क्लिंझर वापरला जातो, जो तेलाला चिकटून राहतो आणि तुमच्या त्वचेवरील घाण काढून टाकतो. आणखी एक फायदा म्हणजे ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढत नाही. चार मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हट्टी घाण निघून जाते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. 

स्टेप 2 

आता दुसऱ्या स्टेपबद्दल सांगायचे झाल्यास, तुम्हाला वॉटर-बेस्ड किंवा फोम-बेस्ड क्लिन्जर घ्यावे लागेल. तेल लावल्यानंतर, तुमचा चेहरा दोन मिनिटांसाठी वॉटर-बेस्ड किंवा फोम-बेस्ड क्लीन्झरने स्वच्छ करा. यामुळे उरलेल्या अशुद्धता निघून जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामुळे त्वचेची डबल क्लिंजिंग होईल. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी सौम्य, सल्फेट-फ्री क्लीन्झर घ्या. तुम्ही सर्वप्रथम क्लीन्झर तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्या. आता दोन मिनिटे क्लिंजिंग करा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवुन घ्या. 

स्टेप 3

4-2-4 स्किनकेयर रुटीनमध्ये शेवटचा टप्पा म्हणजे तुमचा चेहरा आळीपाळीने कोमट आणि थंड पाण्याने स्वच्छ करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्हाला खूप आराम मिळतो. तुम्ही या स्टेपवर तुमची संपूर्ण 4 मिनिटे घालवावीत. यामुळे पोअर्स उघडतात आणि अडकलेले कण/घाण बाहेर पडते. थंड पाणी पोअर्सना टाईट करते आणि मॉइश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते. हे नॅचरल मॉईशचर टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. 

सविस्तर सांगायचे झाल्यास, या स्टेपमध्ये प्रथम तुमचा चेहरा सुमारे 2 मिनिटे कोमट पाण्याने धुवा. तुमच्या बोटांच्या टोकांनी गोलाकार हालचालीत स्वच्छ करा. नंतर, तुमचा चेहरा 2 मिनिटे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुमच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडा. आता स्वच्छ टॉवेलने डॅप-डॅप करून तुमचा चेहरा पुसून टाका.

image credits: pexels