Valentine's Day बद्दल तर सर्वांना माहिती आहे, पण सध्या एक नवीनच शब्द ट्रेंड करत आहे. तो म्हणजे 'Galentine's Day' व्हॅलेंटाईन वीक येताच हा शब्द नेहमीच ट्रेंड करायला लागतो. तुम्हाला देखील या ट्रेंडबद्दल माहिती नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. खरं तर, गॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन डेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा दिवस 13 फेब्रुवारीला साजरा करता जातो, पण या दिवस ऑफिशियल नसतो. विशेषतः गॅलेण्टाईन्स डे खास मुलींसाठी असतो. व्हॅलेंटाईन आठवड्यात कपल्स एकमेकांना स्पेशल ट्रीटमेंट देतात. मात्र, गॅलेंटाईन डे हा केवळ मैत्रिणींमध्ये साजरा केला जातो.
Galentine's Day म्हणजे काय?
Galentines Day मैत्रिणींचे ग्रुप, बेस्ट फ्रेंड्स आणि सोल सिस्टर्ससोबत घालवलेल्या क्षणांचा आनंद साजरा करण्याचा एक खास प्रसंग आहे. आजच्या युगात, जेव्हा महिला त्यांच्या करिअर, स्वप्ने आणि आयडेंटिटीबद्दल अधिक जागरूक होत आहेत. त्यात गॅलेंटाईन डे च्या दिवशी मैत्रिणी एकमेकांचे यश आणि कामगिरीचा आनंद साजरा करण्याची, मोकळेपणाने हसण्याची, बोलण्याची आणि स्वतःला प्राधान्य देण्याची संधी देतो. म्हणूनच हा दिवस हळूहळू तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे, हा दिवस मैत्रीला एक नवी ओळख देतो.
कशी झाली Galentine's Day ची सुरुवात?
Galentines Day ची सुरुवात 2010 मध्ये झाली. तो मूळतः लोकप्रिय हॉलिवूड टीव्ही शो 'Park and Recreation' मध्ये साजरा केला करण्यात आला होता. या शोच्या पात्रांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत ब्रंचचे आयोजन केले होते आणि त्याला 'Galentines Day' असे नाव देण्यात आले. चाहत्यांमध्ये हा प्रसंग लवकरच लोकप्रिय झाला आणि आज तो जगाच्या अनेक भागात साजरा केला जातो.
Galentine's Day 'अशा' प्रकारे साजरा करतात.
गॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या मैत्रिणींना गिफ्ट्स देऊ शकता. तुम्ही मैत्रिणींना ड्रेस, बॅग, कानातले किंवा हॅण्डमेड गिफ्ट्स देऊ शकता. हॅण्डमेड कार्ड किंवा ब्रेसलेट इ. भारी गिफ्ट ऑप्शन्स आहेत. तुम्हाला मैत्रिणींसोबत एखादा मुव्ही प्लॅन करता येईल. त्याबरोबरच, तुम्हाला एक छोटी पिकनिक देखील प्लॅन करता येईल. तर, एखाद्या मैत्रिणीच्या घरी लंच, पार्टी, गेम्स अशा मजेशीर ऍक्टिव्हिटीज प्लॅन करून गॅलेन्टाइन्स डे मस्तपैकी साजरा करता येईल.
Image credit: pexels