Korean Fitness Hacks: कोरियन्ससारखी आकर्षक फिटनेस हवी आहे? फक्त 3 टिप्स आणि बघा कमाल

आजकाल प्रत्येकाला फिट, स्लिम आणि निरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु बिझी लाइफस्टाइल, बाहेर खाण्याच्या सवयी आणि तणावपूर्ण दैनंदिन जीवनामुळे फिटनेसकडे लक्ष देणे, फार जमत नाही. बरेच लोक जिम, डाएट आणि विविध फिटनेस ट्रेंड्सचा प्रयत्न करतात, तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशात, जगभरातील काही देशांची जीवनशैली आपल्यासाठी एक चांगले उदाहरण ठरू शकते आणि कोरिया त्यापैकीच एक आहे.

कोरिअन्सची सुंदरता आणि आकर्षकता सर्वाना माहितीच आहे. तेथील लोक त्यांच्या फिटनेस, स्लिम बॉडी आणि निरोगी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. कोरियन्स तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ कॉम्प्लिकेटेड डाएटवर किंवा इंटेन्स वर्कआऊटवर अवलंबून राहत नाहीत. तर त्याऐवजी लहान, दैनंदिन सवयींमध्ये आरोग्यदायी बदल घडवून आणतात. त्यांचा आहार संतुलित असतो, ज्यामध्ये ताज्या भाज्या, हलके जेवण आणि कमीत कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश असतो. यामुळेच जगभरातील पोषणतज्ञ आणि फिटनेस तज्ञ कोरियन जीवनशैलीचा अवलंब करण्याची शिफारस करतात. 

जर तुम्हालाही जास्त ताण न घेता, सोप्या मार्गांनी तुमचा फिटनेस सुधारायचा असेल, तर कोरियन लोकांच्या या स्मार्ट ट्रेकस तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैनने याबद्दल एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कोरियन्सच्या फिटनेसचे तीन गुपित सांगितले आहेत. 

फरमेंटेड आणि उकळलेले पदार्थ 

दीपशिखाच्या मते, कोरियन लोक त्यांच्या आहारात आंबवलेल्या आणि उकडलेल्या भाज्यांचा समावेश करण्यास प्राधान्य देतात. या दोन्ही गोष्टी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. संतुलित आतडे केवळ पचनक्रियाच सुधारत नाही, तर पचनक्रियेलाही मदत करतात. जेव्हा तुमची पचनक्रिया निरोगी असते, तेव्हा तुमचे वजनही नियंत्रणात राहते.

संतुलित आहार 

कोरियन लोक साधारणपणे संतुलित आहार घेतात. प्रत्येक जेवणात प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट, फायबर आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असतो. या संतुलनामुळे केवळ पोट जास्त वेळ भरलेले राहत नाही, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. यामुळे वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कमी बसणे आणि जास्त वॉक करणे. 

कोरियन लोकांच्या दैनंदिन दिनचर्येत कमी बसणे आणि जास्त चालणे यांचा समावेश असतो. दीपशिखा यांच्या मते, कोरियन लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात जास्त हालचाल करतात आणि कमी बसतात. चालणे हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 

साधरणतः कमी अंतरासाठी ते गाडी चालवण्याऐवजी किंवा वाहतुकीच्या इतर साधनांऐवजी चालण्याला प्राधान्य देतात. यामुळे ते दिवसभर सक्रिय राहतात. या सवयीमुळे त्यांची चयापचय क्रिया तर सुधारतेच, पण दिवसभरात कॅलरीज अधिक सहजपणे बर्न होण्यासही मदत होते. यामुळे ते तंदुरुस्त राहतात आणि त्यांचे वजन देखील नियंत्रणात राहते.