काय आहे लाफ्टर थेरेपी आणि लाफ्टर योग? जाणून घ्या फायदे...



तुम्ही नेहमी अनुभवत असणार की, कुणी विनोदवीर विनोद करतो तर ते ऐकून तुमचं मूड छान होतो आणि शरीरात उत्साहदेखील वाढतो. त्याबरोबरच हसल्याने चेहऱ्यावरील स्नायूंवर ताण येतो त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. अशाचप्रकारे आपण आपल्या दिनचर्येतसुद्धा जर हास्य विभाग सुरु केला तर मानसिक समस्यादेखील याने दूर होऊ शकतात. चला तर मग या विषयाचा सखोलपणे अभ्यास करायला जाणून घेऊयात, लाफ्टर थेरेपी आणि लाफ्टर योगमध्ये काय अंतर आहे? या दोन गोष्टी करण्याच्या योग्य पद्धती आणि फायदे काय आहेत? त्याबरोबरच जाणून घेऊयात कुणी ही थेरेपी करू नये. 

लाफ्टर थेरेपी आणि लाफ्टर योग्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लाफ्टर थेरेपी इमोशनल कल्चरचे भाग आहे. म्हजेच लाफ्टर थेरेपी भावनांवर नियंत्रण करणे शिकवते. लाफ्टर योग, योगा दरम्यान केले जाते. यात शारीरिक हालचालींकडे लक्ष दिले जाते. लाफ्टर योग रनिंग, जॉगिंग आणि स्ट्रेचिंग इ. दरम्यान देखील केला जाऊ शकतो. योग करताने लाफ्टर सेक्शन येतो त्यालादेखील लाफ्टर योग्य म्हणू शकतो.  दोन्ही गोष्टी आपल्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर असतात, असे तज्ज्ञ म्हणतात. लाफ्टर थेरेपी  आणि लाफ्टर योग्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. या दोहोंचा परिणाम शारीरिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर तसेच अध्यात्मिक स्तरावरही होतो. लाफ्टर योग किंवा थेरपी ही एक वैकल्पिक पद्धत आहे जी एखाद्या व्यक्तीच्या या चार स्तरांना स्वस्थ आणि सक्रिय बनवते.

लाफ्टर योग्य आणि थेरेपी करण्याची पद्धत: 

हळू हळू हसण्याने या थेरेपीची सुरुवात केली जाते. त्यांनतर व्यक्तीला हा हा हा.. असे वेगाने बोलायला सांगितले जाते. ही प्रक्रिया नेहमी गटात केली जाते. प्रक्रियेदरम्यान एकमेकांना पाहून हसण्यास सुरुवात करतात. या थेरपीमध्ये कोणत्याही उपकरणांची मदत घेऊन हसविले जाते.

लाफ्टर योगची सुरुवात टाळ्या वाजवून केली जाते. यानंतर, हात आकाशाकडे नेले जातात आणि नंतर दीर्घ श्वास घेतात. थोड्या वेळाने, हात खाली करून तोंडाने श्वास सोडतात. या दरम्यान हा.. हा.. हा... म्हणायला लावतात. या व्यतिरिक्त गुड मॉर्निंग, व्हेरी गुड इत्यादी शब्ददेखील बोलायला सांगितले जाते. मग हात उंचावून, दीर्घ श्वास घेत ओरडतात. हा योग उभे राहून होतो. नंतर जवळच्या व्यक्तीशी हात मिळवून आनंदाची अनुभूती केली जाते.


लाफ्टर थेरेपी आणि लाफ्टर योग केल्याने होणारे फायदे:

-लाफ्टर योग किंवा थेरेपी दररोज केल्याने व्यक्ती डिप्रेशन पासून दूर राहतो. त्याबरोबरच डोकेदुखीची समस्या दूर होते.

-जे लोक नियमितपणे लाफ्टर थेरेपी आणि योग्य करतात त्यांचा मधुमेह नियंत्रित असतो. \

- दररोज हसण्याने आपल्या मेंदूस पुरेसे ऑक्सिजन मिळते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा आणि उत्साह जाणवतात.

-जेव्हा व्यक्ती हसतो तेव्हा ताण वाढवणारे हार्मोन म्हणजेच कार्टिसोलची पातळी कमी होऊ लागते.

- लाफ्टर थेरपी आणि योगामुळे दुर्भावना, ईर्ष्या, द्वेष इत्यादी नकारात्मक भावना दूर होतात. व्यक्तीमध्ये आशावाद आणि सकारात्मक विचार निर्माण होतात.

- या दोन गोष्टी करत असताना जो माणूस मोठ्याने हसतो, त्यांची स्मरणशक्ती तीव्र होते.

- हायपरटेन्शनसाठी ही थेरपी अत्यंत उपयुक्त आहे.

-लाफ्टर थेरपी किंवा योगादरम्यान, चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात.

-लाफ्टर थेरपी किंवा योगामुळे एखाद्या व्यक्तीला जास्त भूक लागते.

लाफ्टर थेरेपी आणि योग्य कुणी करू नये: 

- गर्भवती महिलांनी लाफ्टर थेरेपी आणि योग डॉक्टरच्या सल्ल्याने करावे. 

ज्या लोकांची ६ महिन्यांच्या आत कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी हा योग किंवा थेरपी करू नये.

- आपण एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास, कृपया योग आणि थेरपी करण्यापूर्वी एकदा तज्ञाचा सल्ला नक्की घ्या.




Previous Post Next Post