कांजीवरम साडीशिवाय तुमचा साडी संग्रह अपूर्ण आहे




साडी खरेदी हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण रोजच्या वापरासाठी सलवार कुर्ता घालतो, पण खास प्रसंगी साडीच नेसली जाते. सध्या डिझाइनर साड्यांची चलती आहे. पण तरीही पुढील पारंपारीक साडीशिवाय तुमचा साड्यांचा संग्रह अपूर्ण आहे. 

कांजीवरम साडी- 

कांजीवरम साडी ही बेंगलोरजवळच्या कांची नावाच्या छोट्याश्या खेड्यातील  विणकरांची अप्रतिम कलाकृती आहे. कांची नावाच्या गावात ही साडी बनत असल्याने तिला कांचीपुरम साडीदेखील म्हणतात. या प्रकारच्या साड्या बनवण्यासाठी अत्यंत तलम आणि उच्च प्रतीचं सिल्क वापरलं जातं. या साड्या बऱ्याचदा गडद रंगाच्या आणि डिझाइनर्स असतात. 



या साडीवर केलं जाणारं अत्यंत आकर्षक असतं. या साडीवर असणारी डिझाइन्स बऱ्याचदा पल्लव मंदिरे, राजवाडे, चित्रे यांपासून प्रेरीत असतात. कांजीवरम साडी बनवायला १० -१२ दिवस लागतात. तर खास डिझाइन असणाऱ्या साडी बनवायला २०-२५ दिवस लागतात. या साडीची किंमत २०००- ५०,००० पर्यंत असते. या साडीची किंमत त्यावर केलेल्या जरीकामावरून ठरते.               
Previous Post Next Post