डोळ्यांखाली डार्क सर्कल्स होण्याचे नक्की कारण काय? 'अशा'प्रकारे करा रिमूव्ह



पूर्वीच्या काळी डोळ्यांखाली आणि पापण्यांच्या वर काळेपणा येणे, म्हणजेच वय झाल्याचे चिन्ह समजत होते. मात्र, पण आताच्या काळात तर किशोरवयीन ते लहान मुलांच्या डोळ्यांसाठी काळेपणा म्हणजेच डार्क सर्कल्स येणे सामान्य आहे. डार्क सर्कल्स येण्याची अनेक करणे आपण आधीच ऐकले असतील. जसे की, झोपेचा अभाव, ताणतणाव, वृद्धत्व, डिहायड्रेशन किंवा स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे, डार्क सर्कल्स येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे किंवा दिनचर्येत कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे त्वचेचा रंग काळसर दिसू लागतो. चला तर मग जाणून घेऊयात डार्क सर्कल्स होण्याची सविस्तर कारणे आणि यावरील उपाय-  


डार्क सर्कल्स होण्याची कारणे 


तज्ज्ञ सांगतात की, डोळ्यांखाली एक अतिशय छोटा फॅट पॉकेट असतो, जो आपले वय वाढत असताना अनुवांशिकदृष्ट्या प्रथम नाहीसा होतो. त्यांनतर, किशोरवयात हा पॉकेट नाहीसा होतो. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. विशेषतः जर जीन्समध्ये तो पॅटर्न असेल, तर किशोरावस्थेतच डोळ्यांखालील फॅट पॉकेट नाहीसा होतो. त्यामुळे पोकळी निर्माण होते, म्हणजेच त्वचा इतकी काळी नसते पण फॅट पॉकेट गायब झाल्यामुळे ती खड्ड्यासारखी बनते. यात लाईट रिफ्लेक्ट न झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्वचा खूप काळी दिसते. अशाप्रकारे डार्क सर्कल्स होऊ शकतात. 


डार्क सर्कल्स होऊ नये किंवा कमी करण्यासाठी काय करावे? 


डार्क सर्कल्स रोखण्यासाठी हायड्रेशन आणि न्यूट्रिशन महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसातून किमान एकदा तरी डोळ्यांभोवती मॉइश्चरायजरने गोलाकार मसाज करा. अर्थातच मसाजद्वारे ब्लड सर्क्युलेशन वाढतो, तुम्ही अँटी- क्लॉकवाईज सर्क्युलर मोशनमध्ये डोळ्यांभोवती मसाज करू शकता. यासह तुमच्या स्किनला सहज आराम मिळेल. 

झोप पूर्ण होणे महत्त्वाचे 


स्किनकेअरमध्ये दुर्लक्ष होणे, झोप पूर्ण न होणे, नाईट शिफ्टमध्ये काम करणे, वाजवीपेक्षा जास्त ताणतणाव इ. डार्क सर्कल्स होण्यासाठी महत्त्वाची कारणे आहेत. दररोज किमान सहा तास झोप घेणे, तुमच्या आरोग्यासाठी आणि स्किनकेयरसाठी आवश्यक आहे. एवढेच नाही तर, शरीराला वृद्धत्वविरोधी प्रक्रियेसाठी वेळ मिळावा म्हणून शांत आणि गाढ झोप आवश्यक आहे. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे ताण विसरून जाणे होय. जर उद्या तुम्हाला काही काम असेल तर, त्याबद्दल आज विचार अजिबात करू नका. 

डार्क सर्कल्स घालवायचे घरगुती उपाय 


अनेक DIY हॅक्सने देखील डार्क सर्कल्सपासून मुक्तता मिळवता येईल. डार्क सर्कल्सवरील घरगुती उपायांबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन होय. मध, क्रीम दूध, दही, तूप, ग्लिसरीन घ्या. या सर्व गोष्टी खूप हायड्रेटिंग आहेत, तुम्ही याद्वारे डोळ्यांभोवती मसाज करू शकता. तुम्ही जितके जास्त हायड्रेट कराल तितके तुम्ही ही समस्या टाळू शकाल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्हाला मुरुमे असतील तर या गोष्टी संपूर्ण चेहऱ्यावर लावणे टाळावे. 

डिस्क्लेमर: वरील माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आहे. जर तुम्हाला या माहितीचा अवलंब दैनंदिन जीवनात करायचा असेल तर, आधी तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला नक्की घ्यावा. 

image source: pexels