जाणून घ्या, सुरकुत्या कशामुळे पडतात? आणि ते टाळण्यासाठीचे उपाय...


वाढते वय हे सुरकुत्या पडण्यामागचे मुख्य कारण आहे. पण त्याव्यतिरिक्त देखील अनेक कारणे आहेत ज्यामुळे सुरकुत्या पडू शकतात. पोषक आहारच अभाव, अचानक कमी झालेले किंवा कमी केलेले वजन, तीव्र ऊन आणि प्रदूषण ही सुद्धा सुरकुत्या पडण्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. 

सुरकुत्या केवळ चेहऱ्यावर येतात असे नाही तर हातांवर व पायांवर देखील सुरकुत्या पडतात. कारण सामन्यतः आपण नेहमी फक्त आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतो आणि हातपाय, कोपरा, गुडघा इ. कडे पूर्ण दुर्लक्ष करतो. बरेचदा चेहऱ्याची योग्य वय राखल्याने तो वय लपवतो, पण हातापायांवर पडलेल्या सुरकुत्यांमुळे तुमचे वय सहज लक्षात येते. गुडघा आणि कोपरं हे सर्वात दुर्लक्षिलेले दोन महत्त्वाचे अवयव आहेत. ऊन आणि प्रदूषणामुळे तसेच वजन कमी केल्यामुळे गुडघा आणि कोपरावर सुरकुत्या पडतात. 

अतिदुर्लक्ष केल्याने तरुण वयात देखील गुडघा आणि कोपरावरील त्वचा कोरडी आणि जाड होते. सतत कोपरं टेकून बसल्यास घर्षणामुळे त्वचेचा पॉट बदलतो. त्यामुळे स्नायूंचा लवचिकपणा कमी होऊन सुरकुत्या पडतात. 

सुरकुत्या टाळण्यासाठीचे उपाय: 

- भाज्या, कडधान्ये, फळ, दूध यांनी परिपूर्ण असा समतोल आहार घ्या. पोषणयुक्त आणि अँटिऑक्सिडन्ट असणाऱ्या आहारामुळे सुरकुत्या दूर राहतात. 

- कडक उन्हात जाणे शक्यतो टाळा. जायचेच असल्यास सनस्क्रीन लोशन लावा, स्कर्फ किंवा छत्री वापरा. 

- त्वचा कोरडी पडू नये म्हणून काळजी घ्या. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लिक्विड पॅराफीन आणि शिया बटरयुक्त मॉइश्चरायझर वापरा. 

- आठवड्यातून दोनदा काकडी आणि पपईचा गर लावा. 

- अंघोळ करण्यापूर्वी कोपर व गुडघ्यांवर दही आणि बेसन एकत्र करून अर्धा तास लावून ठेवा. 

- त्वचा कोरडी पडू नये म्हणून पुरेसे पाणी प्या. 


Previous Post Next Post