- पापण्यांची वारंवार उघडझाप करणं हा एक नैसर्गिक व्यायाम आहे. डोळे घट्ट बंद करा आणि मग जास्तीत जास्त उघडण्याचा प्रयत्न करा. किमान दहा वेळा हा व्यायाम करा.
- डोळ्यांची बाहुली २० वेळा उजवीकडे आणि २० वेळा डावीकडे फिरवा. पण यावेळी तुमचे डोळे बंद हवेत.
- आरशासमोर उभे रहा. प्रतिबिंबाच्या डोळ्यात डोळे घालून पाच मिनिट पाहत रहा.
- लांब ठेवलेल्या कोणत्याही वस्तूवर आपलं लक्ष केंद्रित करा. दोन मिनिटांनी जवळच्या वस्तूकडे बघा. आता पुन्हा दूरच्या वस्तूकडे बघा. कमीत कमी दहा वेळा ही क्रिया करा.
-हळूहळू खालून वर आकाशाच्या दिशेने नजर वळवा. तीस सेकंदांपर्यंत दृष्टी स्थिर ठेवा आणि नंतर वरून खाली जमिनीच्या दिशेला नजर झुकवा. हा व्यायाम १५ वेळा करा.
- रात्री झोपताना हलकेच आपले डोळे बंद करा. साधारण्पणे ७२ वेळा तरी आपल्या डोळ्यांची उघडझाप करा. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो.
- फार वेळ टक लावून एखाद्या गोष्टीकडे पाहू नका. कारण यामुळे डोळ्यांवर ताण पडून दृष्टी क्षीण होते.
-वाचताना किंवा दूरची गोष्ट पाहताना पापण्या अर्धवट मिटलेल्या ठेवा. वर पाहताना चेहरा उचलून पहा.
- पापण्यांची उघडझाप केल्यानं डोळ्यांमधला ओलावा टिकून राहतो. वरच्या पापण्यांखाली लॅक्रिमल ग्लॅण्डस या असतात ज्या अश्रू निर्माण करतात त्यामुळे डोळे स्वच्छ राहतात.
- आजूबाजूच्या गोष्टी पाहण्यासाठी नजर तिरकी न करता संपूर्ण चेहरा वळवा. गरज असेल तरंच चष्मा वापरा.
- तीव्र प्रकाश किंवा अपुऱ्या प्रकाशात वाचू नका. वाचन किंवा लिखाण करताना नेहमी पुरेसा प्रकाश हवा.
सन ट्रीटमेंट:
सर्व प्रकारचे दृष्टिदोष दूर करण्यासाठी सन ट्रीटमेंटचा खूप उपयोग होतो. सूर्यप्रकाशासमोर डोळे बंद करून उभे रहा. डाव्या बाजूला वाकून शेक घ्या. या सन ट्रीटमेंटसाठी सकाळचं कोवळं ऊन उपयुक्त ठरतं. पण ५-१० मिनिटंच सूर्यकिरण डोळ्यांवर पडू द्या. नंतर थंड पाण्याने डोळे धुवा. यासही एका बशीत पाणी घ्या. त्यामध्ये २-३ वेळा पापण्यांची उघडझाप करा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन डोळे स्वच्छ होतात.
पामिंग :
दोन्ही हाताच्या तळव्यांनी दोन्ही डोळे झाकुन घ्या. पण डोळ्यांवर दाब पडू देऊ नका. पामिंग करताना खोलीत एकदम कमी उजेड हवा. डोळे झाकल्यानंतर अंधाराऐवजी दुसरे रंग दिसले तर तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर अजून ताण आहे, असे समजा. हा ताण दूर करण्यासाठी तुम्ही काळा रंग, फुल, पान, समुद्र यांची कल्पना करा. अशी कल्पना केल्यावर जर अंधाराची जाणीव व्हायला लागली तर समजा की हीलिंग सुरु झाले आहे. ही क्रिया २-३ मिनिटांपर्यंत करता येते. रात्री झोपण्यापूर्वी पडल्या पडल्या हा व्यायाम करा.
स्नेलेन टेस्ट कार्ड:
डोळे तपासताना डॉक्टर आपल्याला एक अल्फाबेटिकल कार्ड वाचायला देतात. तसेच एक कार्ड आपल्या घराच्या भिंतीवर चिकटवा. डोळ्यांना ताण न देता जमेल तितके लहान अक्षर वाचण्याचा प्रयत्न करा. रोज ५ मिनिटं याचा सराव करा. यामुळे दृष्टिदोष कमी होतात. जसजशी दृष्टी सुधारेल तसतसे कार्ड आणि तुमच्यामधले अंतर वाढवा.