लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण आजकाल वाढतच चालले आहे. एक काळ होता जेव्हा लोक प्रेमसंबंधांबद्दल मुक्तपणे संवाद करणे टाळत होते. पण आज लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि याबद्दल दिलखुलासपणे चर्चादेखील करतात. लिव्ह इन मध्ये राहण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेदेखील आहेत. म्हणजेच, ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला नकारात्मक आणि सकारात्मक बाजू असतात, तशाच गोष्टी या नात्यातही असतात. जाणून घेऊयात, लिव्ह इन रिलेशनशिपचे पैलू...
लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे
- लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये फसवणूक, व्यभिचार इ. होण्याची शक्यता कमी असते.
- लिव्ह इन मध्ये राहणारे कपल्स काही काळात लग्नबंधनाचा विचारदेखील करतात.
- दोन्ही व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या कुठल्याही दबावाशिवाय पार पाडतात.
- या संदर्भात समाज आणि कायदा या दोहोंचेही नियंत्रण आहे.
- यात दोघेही वैयक्तिकरित्या पूर्णपणे मुक्त आहेत.
लिव्ह इन रिलेशनशिपचे तोटे
-नात्यात बंधन न ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु ते पूर्णपणे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत, कारण अविश्वासाची भावना विकसित होण्याची भीती असते.
- यात दोघांद्वारेही दिशाभूल होण्याची भीती कायम आहे, तसेच वचनबद्धतेचा भंग होण्याची भीती देखील आहे.
- आपला पार्टनर आपल्याला सोडणार तर नाही अशी भीती प्रत्येक वेळी मनात असते. ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती उत्पन्न होते.
- एकमेकांचे वर्कस्टाईल आणि संस्कृती समझू शकत नसल्यामुळे समस्या उदभवतात.
- लिव्ह इन मध्ये राहताना कुटुंबाचे प्रेम, वेळ इ. आनंद घेऊ शकत नाही.
- सुरुवातीला जोडीदार भावनिकरीत्या जुळतात, पण काही काळानंतर भावना कमी होऊन कंटाळा यायला लागतो.
लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
- तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत करार करायला हवा.
- एकेमकांसोबत राहण्यासाठी ट्रेनिंग घ्यायला हवी.
- तुमचा पार्टनर जर तुमच्याशी गैरवर्तन करत असेल. म्हणजेच तुमची कमजोरी आणि तुमच्या भावनांशी खेळत असेल तर त्याला वेळीच आवर घालण्याची हिम्मत आणि धैर्य तुमच्यात हवं.
- तुम्हाला तुमच्या पार्टनरवर पूर्णपणे विश्वास असायला हवा. कुठलाही निर्णय घेण्याआधी त्याला आयुष्भर पूर्ण करावे लागेल, हे लक्षात ठेऊनच निर्णय घ्या.
- या नात्यात जर तुम्हाला मध्येच एकटं राहण्याची वेळ आली तर त्यासाठी आधीपासूनच स्वतःला दृढ बनवा. तेव्हाच तुमच नातं एक यशस्वी लिव्ह इन रिलेशनशिप राहील.