मुलींना/ महिलांना बरेचदा लग्न, मुंज, साखरपुडा, रिसेप्शन यांसारख्या कार्यक्रमांना किंवा इतर विशेष प्रसंगांसाठी जावं लागतं. बरेचदा अगदी वेळेवर असलेल्या कार्यक्रमांना काय घालावं? कस तयार व्हावं? लुक कसा करावा? हे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. पण काळजी करू नका... या लेखात आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत. म्हणून हा लेख पूर्ण वाचा.
चला तर जाणून घेऊयात विशेष प्रसंगांमध्ये तयार होण्यासाठी खास टिप्स..
- सर्वप्रथम कार्यक्रम किंवा प्रसंगानुसार आपल्या पोषाखाची निवड करा. जर सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर सोप्या भाषेत ट्रेडिशनल कपडे वापरा. शक्यतो चुडीदार सलवार घालण्याऐवजी साडी नेसलेली उत्तम ठरेल.कार्यक्रमात सिनिअर सिटिझन्समध्ये वावरायचे असल्यास डिझाइनर साडीपेक्षा काठापदराची साडी शोभून दिसेल. या पोषाखांसोबत कार्यक्रमात प्रशंसेसाठी तयार रहा.
- मात्र आपल्या वयाला शोभेल असाच पोशाख असावा.
- रात्रीच्या कार्यक्रमात चमकदार दिसणारे कपडे घालू शकता. खडीकाम किंवा टिकल्यांचे नक्षीकाम केलेला ड्रेस किंवा साडी छान दिसेल. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या उजेडात तुमचा पोशाख चमकून उठेल आणि तुमचे लुक यात वेगळे दिसेल.
- शक्यतो ऑइल बेस्ड मेकअप करणं टाळा. उन्हाळ्याच्या दिवसांत घामामुळे मेकअप टिकत नाही. म्हणून अशा वेळी वॉटरप्रूफ मेकअप करा.
- डार्क कलरची लिपस्टिक लावणार असाल, तर फिक्या रंगाची आयशॅडो लावा. कारण दोन्ही डार्क लावल्यास मेकउप अगदी भडक दिसेल.
- रात्रीच्या वेळी डार्क रेड, मरून किंवा ब्राऊन शेडची लिपस्टिक लावू शकता. याउलट दिवसा पिंक, पीच कलरची लिपस्टिक छान दिसेल.
- शक्यतो कपड्यांना मॅच होणारेच दागिने आणि बांगड्या घाला.
- पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर मोत्याचे दागिने विशेष शोभून दिसतात. याउलट डार्क कलरच्या जसे की हिरव्या, लाल, निळ्या, मरून पोशाखावर सोन्याचे किंवा सोनेरी दागिने छान दिसतात.
- रात्रीच्या कार्यक्रमात हिऱ्याचे किंवा खड्याचे दागिने घातल्यास तुमचं रूप उजळून दिसेल.
- ग्रे, स्लेट कलर किंवा काळ्या रंगाच्या पोशाखावर ऑक्सिडाइज्ड सिल्वर ज्वेलरीदेखील शोभून दिसतात.
- सणवार किंवा लग्नसमारंभाला शक्यतो पारंपरिक पोशाखच घाला.
- आपल्या हेअरस्टाइलवर एखादा गजरा, फुलं किंवा कपड्यांशी मिळतेजुळते ब्रोच लावू शकता.
- सणाला किंवा लग्नाला आपल्या हातावर मेंदी काढून घ्या. यामुळे तुम्ही सर्वांमध्ये अजून आकर्षक दिसणार.
- आणि शेवटी एक स्मितहास्य केले की तुमचे लुक कार्यक्रमासाठी रेडी आहे.