जाणून घ्या, घरच्या घरी फेशियल करण्याची योग्य पद्धत आणि घ्यावयाची काळजी...


फेशियल हा असा एक सौंदर्यउपचार आहे ज्यामुळे चेहऱ्याला मालिश होऊन, रक्तप्रवाह चांगले होऊन त्यातील घाण तर स्वच्छ होतेचं. पण फेशियलमुळे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव देखील दूर होतात. मुलींनी वयाच्या पंचविशीनंतरच फेशियल करण्यास सुरुवात केली पाहिजे. जर त्वचा कोरडी आणि निस्तेज असेल, तर महिन्यातून दोनदा फेशियल करावे. अन्यथा महिन्यातून एकचदा फेशियल करणे पुरेसे आहे. 

मुरूम किंवा ऍलर्जी असणाऱ्यांनी फेशियल करू नये. तुम्ही घरच्या घरीदेखील फेशियल करू शकता. यासाठी तुमच्याकडे क्रीम, क्लिंजिंग मिल्क, फेसपॅक, बर्फ, कापूस, छोटा नॅपकिन, मॉइश्चरायझर आणि गुलाबजल हे साहित्य हवेत. 

योग्य पद्धत:

- सर्वप्रथम चेहऱ्यावर येणारे केस मागे बांधा. 

- क्लिंजर अथवा साबण वापरून चेहरा स्वच्छ करा. जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ,  सौंदर्य प्रसाधन निघून जातील. चेहऱ्यासोबत मान व गळा स्वच्छ करा.

- कपाळ, गाल, हनुवटी आणि गळ्यावर मॉइश्चरायझर लावा. गळ्याकडून  वरच्या दिशेला मालिश करून माइश्चराइझर चेहऱ्यामध्ये मुरवा. 

- कोमट पाण्याने चेहरा धुवा, नॅपकिनने हलकेच चेहरा टिपून घ्या. 

- आता आपल्या त्वचेच्या अनुरुप फेसपॅक बनवा. चेहरा आणि गळ्यावर लावा. गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवा. 

- आता २० ते २५ मिनिट ते पॅक डोळ्यावर राहू द्या. सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवा. उन्हाळ्यात थंड व थंडीत कोमट पाणी वापरा. 

- चेहरा नॅपकिनने टिपून मॉइश्चरायझर लावा. 

घ्यावयाची काळजी:

- फेशियल करताना थंड आणि स्वच्छ पाणी वापरा. कारण पाण्यात असणारे हानिकारक घटक त्वचेच्या बाहेरच्या थराचे नुकसान करतात. 

- फेशियल नेहमी एका लयीत करावे. जेणेकरून चेहरा व संपूर्ण शरीर सैलावेल. 

- फेशियल करण्याची खोली अधिक थंड अथवा गरम असू नये. कारण गरम हवेमध्ये त्वचेतील नैसर्गिक तेल बाहेर पडतो. तसेच थंड हवेत त्वचा कोरडी होते. 

- आपल्या स्किन टाईपला अनुरूप असा फेशियल आणि पॅक निवडा. 

- मसाज करताना खांद्याकडून  दंडाकडे मसाज करा. याला टेन्शन आऊट स्ट्रोक म्हणतात. 

- २० दिवसातून एकदा तरी फेशियल अवश्य करावे. 

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण त्वचेला अधिक मसाज करू नये.