१. पाटल्या:
पाटल्यांमध्ये जाळीच्या पाटल्या, तोडीच्या पाटल्या, ठोक्याच्या पाटल्या असे विविध प्रकार जास्त करून दिसून येत. पण आजही स्त्रिया हिरव्या बांगड्यांच्या मागे एक एक पाटली घालतात. पूर्वी पाटल्यांवर कोयरी, पानं, रेघा, वेल यांची नक्षी हातानं कोरली जाई, पण आता पाटल्यादेखील मशीनवर बनवत असल्याने त्याच्या नक्षीमध्ये वैविध्य दिसून येते.
पाटल्यांच्या खालोखाल नंबर लागतो बिलवरांचा. चुडा भरताना पाटल्या, हिरव्या बांगड्या व मध्ये मध्ये सोन्याचे बिलवर घालतात. बिलवरांची रुंदी ही पाटलीपेक्षा कमी असते. बहुतेक वेळा पाटली आणि बिलवरावरील नक्षी एकेमकांना मॅचिंग असते.
पाटलीच्या मागे घातला जाणारा बांगडीचा प्रकार म्हणजे पिछोड्या. सोन्याचे मणी वापरून नाजूक कलाकुसर करून पिछोड्या बनवल्या जातात.
४. गोठ:
लहान बाळाच्या पायातील वाळ्याप्रमाणे यांचा आकार असतो. गोठ म्हणजे शुद्ध सोन्यापासून बनवलेली भरीव बांगडी. यावर कोणतीही नक्षी नसते. गोठ पाटलीच्या पुढे किंवा हिरव्या बांगड्यांच्या सर्वांत मागे घालतात.
५. तोडे:
पूर्वापार वापरला जाणारा बांगडीचा हा प्रकार अजूनही टिकून आहे. तोड्यांमध्ये गहू तोडे, जिलबी तोडे, शिंदेशाही तोडे असे अनेक प्रकार दिसून येतात. बांगड्यांच्या पुढे तोडे घालतात. तोडे स्क्रू खेचून किंवा बांगडीसारखे देखील घालता येतात. मोती किंवा सोन्यापासून तोडे बनवतात.