मुलींसाठी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स अशी समस्या आहे, ज्यामुळे मुलींचे सौंदर्य कमी होते. मुलींच्या साधारण नाकावर आणि चिनवर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात, ज्यामुळे स्किन डल होते. ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी महिला महागडे प्रोडक्ट्स वापरतात, ब्युटी ट्रीटमेंट घेतात पण ब्लॅकहेड्स निघत नाही. या चिवट ब्लॅकहेड्सना घरी अगदी सोप्या पद्धतीने काढता येते. चला तर जाणून घेऊयात ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्याचे उपाय...
ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होण्याची कारणे...
धूळ- प्रदूषण:
बिझी लाईफस्टाईलमध्ये महिला आपल्या त्वचेची काळजी घेत नाही. धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स येतात. जेव्हा धूळ-माती चेहऱ्यावर येते आणि आपण चेहरा नीट स्वच्छ करत नाही, तेव्हा ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होतात.
मेकअप:
आपण नेहमी चेहऱ्यावर फाऊंडेशन आणि मेकअप प्रोडक्ट्स वापरतो. ज्यामुळे त्वचेवरील रोम छिद्र बंद होतात आणि घाण जमा होते. म्हणून चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होतात.
हार्मोनल चेंजेस
आजच्या बिझी लाइफस्टाईल आणि ताणतणावामुळे हार्मोनल चेंजेस होतात. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स हार्मोनल चेंजेसमुळे देखील होतात.
चुकीची स्किनकेअर रुटीन:
इंटरनेटवर बघून बऱ्याच महिला चुकीची स्किनकेअर रुटीन फॉलो करतात. चुकीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये महिलांची त्वचा ग्लो करण्याऐवजी खराब होते. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स अशा स्किनकेअर रुटीनमुळे देखील तयार होतात.
- टूथपेस्ट आणि मिठाने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करा.
टूथपेस्टमध्ये मिंट आणि अँटी इंफ्लामेंट्री गुणधर्म असतात, जे पोअर्स ओपन करून बॅक्टेरिया कमी करायला मदत करतात. थोडे टूथपेस्ट घ्या आणि नाकावर लावा. त्यानंतर त्यावर थोडे मीठ घालून हलक्या हाताने रब करा. असे केल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होणार आणि डेड स्किनदेखील निघून जाईल.
- स्टीम घ्या.
ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्यासाठी स्टीम घेणे खूप लाभदायी असते. दोन मिनिट स्टीम घ्या आणि नंतर स्क्रब करा. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स निघून जातील. स्क्रब केल्यानंतर एका कापडामध्ये बर्फ घेऊन नाकावर लावा, यामुळे ओपन पोअर्स बंद होतील.