नक्की वाचा! डोळे अधिक आकर्षक दिसावेत म्हणून 'या' काही विशेष मेकअप टिप्स...

असं म्हणतात,"डोळे न बोलताच सगळं काही सांगून जातात." अशी डोळ्यांमध्ये एक जादू असते. आवडत्या व्यक्तीचे ते निरागस डोळे बघुन आपलं सगळं राग वितळून जातो. मुली मेकअप करून आपले डोळे आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतात. पण काही छोट्या छोट्या चुका मेकअप करताना होतात. त्यामुळे डोळे आकर्षक नाही तर भयाण दिसतात. अशाच छोट्या छोट्या चुका होऊ नयेत म्हणून हा लेख पूर्ण वाचा.

चला तर जाणून घेऊयात डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काही विशेष मेकअप टिप्स... 

- डोळ्यांचा मेकअप करताना सर्वप्रथम डोळे बंद करून आयशॅडो लावा. पहिल्यांदा पावडर लावून मग आयशॅडो लावल्यास ते जास्त काळ टिकते. 

- जर तुमचे डोळे खूप मोठे असतील तर तुम्ही डार्क रंगाची आयशॅडो लावा. 

- आयशॅडो नेहमी वरून खालच्या दिशेला डोळ्यांच्या कोपऱ्यातुन लावा.  

- जर तुम्हाला डोळ्यांना नॅचरल लुक द्यायचा असेल तर प्रथम नॅचरल शेडचे आयशॅडो लावा. मग डार्क शेड लावा. पुन्हा एक नॅचरल शेड लावा आणि शेवटी डार्क शेड लावा. 

-  जर तुम्ही भुवया आणि आयशॅडोच्या मध्ये हायलाइनर आयशॅडो लावले तर डोळे अधिकच आकर्षक दिसतील. 

- जर तुमच्या पापण्या पातळ असतील तर आय कलर म्हणजेच खोट्या पापण्या लावा. 

- पापण्यांवर मस्कारा लावल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा की मस्कारा सुकल्याशिवाय डोळे मिटू नका. 

- दिवसा हलक्या तर रात्री डार्क रंगाची आयशॅडो लावा. 

- दिवसा नेहमी पेन्सिल आयलायनर लावा. 

 - जर डोळे लहान असतील तर ते मोठे दिसण्यासाठी डोळ्यांखाली पांढरे आयलायनर लावा. 

- गोलाकार डोळे लांब आणि बदामी आकाराचे दिसण्यासाठी नेहमी ब्रॉन्झ किंवा भुऱ्या रंगाचे आयलायनर आणि आयशॅडो  लावा. 

Previous Post Next Post