स्तन सुडौल आणि योग्य आकारात ठेवण्यासाठी विशेष आणि सोप्या टिप्स...

स्त्री सौंदर्यामध्ये स्तनांना विशेष महत्त्व आहे. निरोगी आणि सुडौल स्तन हे स्त्रीचे आभूषण आहे. गोल आणि पूर्ण विकसित स्तनांना आदर्श मानलं जातं. बरेचदा योग्य देखभालीअभावी स्तन खूप लहान राहतात तर कधी कधी खूप मोठे व लटकल्याप्रमाणे होतात. प्रमाणबद्ध स्तन स्त्रीचे सौंदर्य अजून खुलवतात. चला तर जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून, स्तन सुडौल आणि योग्य आकारात ठेवण्यासाठी सोपे उपाय... 

- दूध आणि फळांसोबत पौष्टिक आहार घ्या. 

- स्तनांना खालून वरच्या दिशेला मालिश करा. मालिश करण्यासाठी शक्यतो ऑलिव्ह तेलाचा वापर करा. योग्य मसाजमुळे स्तन लटकल्याप्रमाणे दिसणार नाहीत. 

- स्तनांना सुडौल बनवण्यासाठी व्यायाम करा. हाताचे पंजे खांद्यावर ठेवा आणि हात वर्तुळाकार फिरवा. सरळ उभे रहा. दोन्ही हात शरीरासमोर आणा. हात कोपरात वाकवा. डाव्या हाताने उजव्या हाताचे कोपर तर उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडा. हळूहळू हातावर ताण द्या. याच स्थितीत हात डोक्याच्या वर घ्या आणि वरच्या दिशेने खेचा. यामुळे स्तनांचे स्नायू मजबूत होऊन स्तन सुडौल बनतात. 

- दीर्घ श्वास घ्या आणि छाती फुगवा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. १२-१५ वेळा ही कृती करा. 

- स्तनांचा आकार लहान असेल तर पॅडेड ब्रा वापरा, ज्यामुळे स्तन मोठे दिसतील.

- अतिरिक्त वजन कमी करा, ज्यामुळे स्तनांवरील चरबी कमी होईल. 

- सलाड आणि हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खा. 

- आपल्या बाळाला दूध अवश्य पाजा, ज्यामुळे स्तन योग्य आकारात राहतील. 

- वयात येताना आणि मासिक पाळी सुरु झाल्या झाल्या मुलींना योग्य मापाची ब्रा घालण्यास द्यावी. यामुळे स्तनांचा योग्य प्रकारे विकास होईल. 

- खूप गरम पाण्याने स्नान करणे टाळा. 

Previous Post Next Post