चटपट्या लिंबूचे 'अशाप्रकारे' सेवन करणे, वजन आणि बेली फॅट कमी करण्यास आहे लाभदायक...

मागील काही वर्षांपासून वर्क फ्रॉम होमचे कल्चर वाढले आहे. अशामध्ये ९ ते १० तास एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे शारीरिक सक्रियता कमी होते, यामुळे वजन वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जाड असलेल्या लोकांना आजारांचा जास्त धोका असतो. म्हणून प्रत्येकाला फिट राहणे गरजेचे आहे. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातून टॉक्सिक पदार्थ काढले की वजन कमी होण्यास मदत होते. त्यांच्या मते, लिंबाच्या सेवनाने शरीर सहज स्वच्छ होतो. वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध 'लिंबू'. चला तर याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात...


कॅलरीजचे प्रमाण कमी करतो-

तज्ज्ञांच्या मते, लिंबूमध्ये कॅलरीज नसतात आणि लिंबू मेटॅबॉलिझम बूस्ट करण्यासदेखील सहायक असतो.

फॅट बर्न करतो-

दररोज सकाळी लिंबूपाणी घेतल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ निघून एक्स्ट्राफॅट बर्न होतो, ज्यामुळे वजन अगदी सहजरित्या कमी होतो. त्याबरोबरच मसल्स टोन होण्यास आणि पोटाची चरबी कमी होण्यास देखील मदत मिळते.

लवकर भूक जाणवत नाही-

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे "ओव्हरइटिंग होऊ नये" याबद्दल काळजी घ्यायला हवी. अशात लिंबूपाणी पिणे लाभदायक ठरेल कारण यामुळे पोट बराच वेळपर्यंत भरून राहते. तज्ज्ञांच्या मते, एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने 'फूड क्रेविंग्स' होत नाही. यामुळे जास्त खाणे टाळता येते, म्हणून वजन कमी होण्यास मदत मिळते.

- लिंबू पाणी पिल्याने डिहायड्रेशन देखील होत नाही.

सेवन कसे करावे?

एका भांड्यात पाणी घालून उकळून घ्या आणि ते पाणी कोमट झाल्यावर त्यात लिंबू घालून प्या. तुम्हाला हवं असल्यास या ड्रिंकमध्ये शहद किंवा हळद घालून देखील ही ड्रिंक घेता येते.

Previous Post Next Post