Healthy Breakfast: ओट्स की कॉर्नफ्लेक्स? काय आहे जास्त हेल्दी? जाणून घ्या, उत्तम पर्याय...

इंडियन ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सने आपले महत्त्वपूर्ण स्थान तयार केले आहे. लो कॅलरीज असल्यामुळे हेल्दी फ्रिक्सदेखील ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सला जास्त प्राधान्य देतात. याशिवाय ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. तुम्ही सुद्धा  हेल्थ आणि वेळ वाचवण्यासाठी ओट्स आणि  कॉर्नफ्लेक्सला पसंती देत आहात, तर जाणून घ्या ओट्स आणि कॉर्नफ्लेक्समधून काय आहे जास्त हेल्दी... 

न्यूट्रिशन व्हॅल्यू :

कॉर्न फ्लेक्स- 

कॉर्न फ्लेक्स मक्यापासून बनवतात. १०० ग्रॅम कॉर्न फ्लेक्समध्ये ०.४ ग्रॅम फॅट, ८४ ग्रॅम कार्ब्स, ७.५ ग्रॅम प्रोटीन, १.२ ग्रॅम फायबर, २% कॅल्शियम आणि ३७० एकूण कॅलरीज असतात. 

 ओट्स- 

 १०० ग्रॅम ओट्समध्ये १०.८ ग्रॅम फॅट, २६.४ ग्रॅम प्रोटीन, १६. ५ ग्रॅम फायबर, १०३ ग्रॅम कार्बो, ८% कॅल्शियम आणि ६०७ एकूण कॅलरीज असतात.

कॉर्नफ्लेक्स खाण्याचे फायदे:

कॉर्नफ्लेक्समध्ये कोलेस्टेरॉल कमी असतो, जे हृदयासाठी हेल्दी आहे. कॉर्नफ्लेक्स दुधात खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रोटीन मिळतो. कॉर्नफ्लेक्स डाएटिंग करणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता आहे. यात असलेल्या कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यास फायदा होतो. 

ओट्स खाण्याचे फायदे:

नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. हे वजन कमी करण्यास मदत करते. ओट्समध्ये भरपूर फायबर असतात, जे मेटॅबॉलिझमची गती वाढवतात. जे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. ओट्सना कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूडमध्ये समाविष्ट केले आहे. ज्यात कमी कोलेस्टेरॉल असल्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित करते आणि हृदय निरोगी ठेवते.

जाणून घ्या, ओट्स आणि कॉर्नफ्लेक्समध्ये उत्तम पर्याय काय आहे? 

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कॉर्न फ्लेक्समध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही आहारात ओट्सचा समावेश करू शकता. यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. याशिवाय ओट्समध्ये थोडा गूळ मिळवून खाल्ल्याने ते थोडे टेस्टी बनते. ओट्ससह तुम्ही बऱ्याच रेसिपी बनवू शकता. जसे की ओटमील, मसाला ओट्स, ओट्स चिल्ला आणि ओट्स स्मूदी.


Previous Post Next Post