Series : सोळा श्रुंगार

 सोळा श्रुंगारामधील अकरावे श्रुंगार : मेहेंदी 


भारतीय संस्कृतीमध्ये परंपरागत सौंदर्य प्रसाधनांमध्ये मेहेंदी सर्वात वरच्या स्थानावर आहे. साखरपुडा असो वा लग्न ; ते मेहेंदीशिवाय अपूर्ण आहे. आपल्याकडे अजूनही नागपंचमीसारख्या सणाला लहान मुली व स्त्रिया आवर्जून मेहेंदी काढतात. कारण मेहेंदी मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. 

असे म्हणतात की, " वधूच्या हातावरील मेहंदीचा रंग जितका गडद होत जातो, तितके नववधु व तिच्या जोडीदारातील प्रेम अधिक दृढ होते." त्याचप्रमाणे जितके जास्त दिवस तिच्या हातावर मेहंदी टिकते तितके जास्त त्या नववधुला तिच्या सासरी प्रेम मिळते, असा समज आहे. मेहंदीच्या निरनिराळ्या डिझाईन्स मध्ये देखील जीवनातल्या अनेक गोष्टीचे संकेत लपलेले असतात. असं म्हणतात की, तळहाताच्या मागे काढलेली मेहंदी तिचे व तिच्या पतीचे संकटापासून सरंक्षण करते तर तळहातावरील फुलांच्या नक्षी तिच्या नव्या आयुष्याच्या सुख-समृद्धीची प्रतिके असतात.    

पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश इ. ठिकाणी मेहेंदी हा विवाह सोहळ्याचाच एक भाग आहे. 

Previous Post Next Post