उन्हाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून त्रस्त झालात? 'या' छोट्या टिप्स करतील मोठी मदत

उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे केसांमध्ये डँड्रफ, खाज येणे आणि केसगळती सारख्या समस्या येतात. उन्हाळ्यात केसगळतीच्या समस्येमुळे अनेक मुली त्रस्त असतात. केसगळती थांबवण्यासाठी आपण महागडे शाम्पू आणि प्रोडक्ट्सचा वापर करत असतो. मात्र, प्रोडक्ट्समधील केमिकल सुद्धा केसगळतीचे मोठे कारण असू शकते. केसगळती कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय देखील उपयुक्त आहेत, ज्यामुळे केस हेल्दी आणि मजबूत राहतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला केसगळती कमी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. 

Also Read: महागड्या प्रोडक्ट्सची काय गरज? घरच्याघरी मध, मलाईच्या फेस मास्कने चेहऱ्यावर येतो अस्सल ग्लो

उन्हाळ्यामधील हेअर केअर 

- उन्हाळ्यात सूर्यकिरणांपासून स्काल्पचे रक्षण करण्यासाठी उन्हात बाहेर पडताना छत्री घ्या किंवा गोल टोपीचा वापर करा. जेणेकरून तुमच्या स्काल्पचे रक्षण तर होईलंच आणि तुमचे लुक देखील स्टाईल होईल. 

- उन्हाळ्यात तुमच्या स्काल्पवर लवकर घाण तयार होते, म्हणून आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा सौम्य शाम्पूने केस धुवून घ्या.

- केस धुण्यापूर्वी खोबरेल तेल लावा, यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल. यामुळे केसगळती कमी होईल.

- तुम्ही आठवड्यातून एकदा हेअर मास्क देखील वापरू शकता. तुम्ही बाजारातून किंवा घरी बनवलेला हेअर मास्क तुमच्या केसांवर लावून स्मूद-सिल्की शकता.

तुमची लाईफस्टाईल 

- तुमच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. प्रोटीनयुक्त आहार घ्या, ओमेगा फॅटी ऍसिड, आयर्न, व्हिटामिन A, D, C, E आणि B12 ने समृद्ध असलेले पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. 

- तुमच्या शरीराच्या गरजेनुसार दररोज पुरेसे पाणी प्या, हेल्दी लाइफस्टाइलचा अवलंब करा.

- 7 ते ८ तासांची पूर्ण झोप घ्या. तसेच, ताणतणावाचे व्यवस्थापन करा. गरज नसल्यास ताण घेण्याची आवश्यकता नाही. 

स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. 



Previous Post Next Post