चाळीशीनंतरही ग्लो करेल तुमचा सुंदर चेहरा! घरच्या घरीच 'या' सोप्या गोष्टींनी बनवा नॅचरल फेस टोनर्स

तुमच्या स्किनकेअरमध्ये फेस टोनर महत्त्वाची भूमिका निभवातो. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी लोक अनेकदा फेस टोनर वापरतात. पण बाजारात मिळणारे फेस टोनर अनेकदा महागडे असतात. एवढेच नाही तर, बाजारातील फेस टोनर केमिकल बेस्ड असतात. केमिकल्समुळे तुमच्या त्वचेला त्रास देखील होऊ शकते. फेस टोनर हे एक प्रकारचे लिक्विड बेस्ड स्किनकेअर प्रोडक्ट आहे. फेस टोनर चेहरा स्वच्छ केल्यानंतर लावले जाते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे कार्य करते. तुम्ही घरच्या घरीच सोप्या पद्धतीने फेस टोनर बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून नैसर्गिक फेस टोनर कसे बनवता येईल?

गुलाबजल 

तुम्हाला गुलाब जलने देखील फेस टोनर तयार करता येईल. तज्ञ सांगतात की, गुलाबजल त्वचेच्या PH पातळीला संतुलित करण्यास मदत करतात. कारण गुलाब जल त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळून तुम्ही फेस टोनर तयार करू शकता. तुम्ही हे टोनर सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर लावू शकता.

कोरफड 

तुम्ही कोरफड आणि व्हिटॅमिन-E वापरून फेस टोनर बनवू शकता. कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-E वृद्धत्वविरोधी चिन्हे कमी करण्यास मदत करते, असे सांगितले जाते. टोनर तयार करण्यासाठी, सर्वप्रथम कोरफडचा जेल काढा. यानंतर त्यात व्हिटॅमिन E कॅप्सूल आणि गुलाबजल मिक्स करा. हे टोनर तुम्ही बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये चार-पाच दिवस ठेऊ शकता.  

काकडी 

काकडीमध्ये थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. काकडीचे लहान तुकडे करा आणि नंतर ब्लेंडरमध्ये मिक्सचर करा. त्यानंतर मिक्सचरचा रस काढून, नंतर ते स्प्रे बॉटलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवा. आम्ही तुम्हाला सांगतो की, काकडीत 95% पाणी असते, जे त्वचेला थंड ठेवते. हे सनबर्नसारख्या समस्येवर उपचार करण्यास उपयुक्त आहे.

टीप: वरील माहितीचा अवलंब करण्यापूर्वी आपल्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.   

Image Credit: adobe stock 


Previous Post Next Post