पहिल्यांदाच फेशियल हेयर रिमूव्ह करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक

एखादी मुलगी किंवा महिलेच्या चेहऱ्यावर केसांचे प्रमाण अधिक असेल, तर चारचौघात ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असते. त्यामुळे आजकाल मोठ्या प्रमाणात महिलावर्ग आपले फेशियल हेअर काढून टाकण्याचा निर्णय घेतात. या साठी अनेक ट्रीटमेंट्स देखील उपलब्ध आहेत. मात्र, वॅक्सिन्ग, शेविंग आणि थ्रेडींगसारखे उपाय वापरून देखील चेहऱ्यावरील केस काढता येतात. जर तुम्ही पहिल्यांदा फेशियल हेअर रिमूव्ह करणार असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. फेशियल हेअर काढण्यासाठी योग्य पद्धत अवलंबणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा त्वचेवर पुरळ, जळजळ किंवा मुरुम यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Also Read: कढीपत्ता आणि आवळ्याने तुमचे काळेभोर केस होतील लांब, जाणून घ्या सर्व फायदे

स्कीन टाईप 

प्रत्येकाची स्किन टाईप वेगवेगळी असते. ऑईली, ड्राय, सेन्सिटिव्ह स्किन टाईप मधून तुमचा स्किन टाईप कोणता? ते ओळखा. चेहऱ्यावरील केस काढण्यापूर्वी, तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. संवेदनशील त्वचेवर रेझर किंवा वॅक्सिंगचा चुकीचा वापर केल्याने जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते.

त्वचेची स्वच्छता 

चेहऱ्यावरील केस काढण्यापूर्वी, सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्वचेतील तेल आणि घाण काढून टाकणे महत्वाचे आहे, जेणेकरून रेझर किंवा वॅक्सिंग करताना पोअर्स बंद होणार नाहीत. एवढेच नाही तर, कुठल्याही इन्फेक्शनचा धोका राहणार नाही. 

स्वच्छ आणि शार्प टूल्सचा वापर करा. 

तुम्ही रेझर किंवा एपिलेटर वापरत असलात तरी, ते नवीन आणि स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. गंजलेले किंवा जुने ब्लेड कट वापरल्याने त्वचेवर संक्रमण होण्याची शक्यता असते. जर तुम्ही वॅक्स करणार असाल तर, त्याचे तापमान नक्की तपासून घ्या. 

मॉइश्चरायझर 

चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर लगेच त्वचेवर हलके आणि सुगंध नसलेले मॉइश्चरायझर लावून घ्या. यासह त्वचा थंड होईल आणि जळजळ होणार नाही आणि त्वचेला विश्रांती देखील मिळेल. केस काढल्यानंतर किमान 6-८ तासांच्या अंतराने मेकअप करून घ्या. 

डिस्क्लेमर: वरील माहिती केवळ तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी आहे. जर तुम्हाला या माहितीचा वापर दैनंदिन जीवनात करायचा असेल तर, सर्वप्रथम डॉक्टर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Image source: adobe stock 

Previous Post Next Post