ऑनलाईन डेटिंगच्या दुनियेत रोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात. ऑनलाईन डेटिंगमध्ये तुमचंसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. कपल्स अनेकदा मजबूत नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि एकमेकांच्या जवळ राहण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करतात. आता या दुनियेत एक नवा ट्रेंड सामील झाला आहे. होय एक ट्रेंड सध्या कपल्समध्ये लोकप्रिय होत आहे, ज्याला 'झिप कोडिंग' म्हणतात. हा नवा ट्रेंड तुम्हाला जेन-Z रिलेशनशिप्समध्ये जुन्या काळातील प्रेमाची म्हणजेच ओल्ड स्कुल लव्हची आठवण करून देईल. ओल्ड स्कुल लव्ह देखील अनेकांचे स्वप्न असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात 'झिप कोडिंग' डेटिंग ट्रेंडबद्दल सविस्तर माहिती-
Also Read: You are in one sided love? how to identify it, know simple tips
झिप कोडिंग डेटिंग ट्रेंड म्हणजे काय?
डेटिंगच्या जगात झिप कोडिंग ट्रेंड म्हणजे त्याच परिसरात, कॉलोनीमध्ये किंवा पोस्टल कोडमध्ये राहणाऱ्या जोडीदाराशी डेटिंग करणे. हे 90 च्या दशकातील बहुतेक प्रेमकथांशी मिळतेजुळते ट्रेंड आहे. शेजारी, नातेवाईक आणि कुटुंब बहुतेकदा जवळपास असल्याने हा ट्रेंड काही चॅलेंजेस निर्माण करू शकतो. मात्र, इतर शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. एवढेच नाही तर, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या परिसरात जागा भाड्याने घेऊ शकता.
झिप कोडिंग ट्रेंडचे फायदे
सोप्या भेटी आणि कमी खर्च
जर तुम्ही आणि तुमचे पार्टनर एकाच परिसरात राहत असाल तर वेळ आणि पैसे दोघांची बचत होते. जर तुमच्याकडे कामकाजाच्या व्यापामुळे वेळ कमी असेल तरीही तुम्ही थोडा वेळ काढून नक्की भेटू शकता. अशाप्रकारे तुम्ही ताणतणावात असतानाही कॉलिटी टाइम स्पेंड करू शकता. हेच छोटे छोटे सुंदर क्षण तुमच्या रिलेशनला मजबूत करतील.
कम्युनिकेशन गॅप नसतो.
आजच्या रिलेशनशिप्समध्ये कम्युनिकेशन गॅपमुळे अनेक संबंध बिघडतात. जवळपास राहिल्याने कपल्समधील संवाद प्रभावी राहतो. जर फोन किंवा मेसेजवरून संवाद चांगला होत नसेल, तर तुम्ही एकमेकांना भेटून कोणतेही गैरसमज सहज दूर करू शकता. जवळ राहिल्यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होतात. अशा परिस्थितीत, तुमच्यात कम्युनिकेशन गॅप उरणार नाही.
सुरक्षित फील करणे.
आपल्या कुटुंबापासून लांब राहणारे कपल्स इमर्जन्सीमध्ये आपल्या पार्टनरची मदत घेऊ शकतात. जर अचानक तुमच्या पार्टनरची प्रकृती बिघडली तर, तुम्ही त्यांची मदत करण्यास सक्षम असाल. अशाप्रकारे झिप कोडिंग ट्रेंड कपल्ससाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण यामुळे सुरक्षिततेची भावना तयार होते. एकत्र लिव्ह इनमध्ये राहण्यापेक्षा कपल्ससाठी हा पर्याय उत्तम आहे. खरं तर, झिप कोडिंग ट्रेंडमध्ये कपल्स त्यांच्या पर्सनल स्पेससह जवळ राहतात.
image credit: pexels