हिवाळ्यात बेस्ट विंटर लुकसाठी स्टाईल करा 'या' उबदार शॉल, मिळवा परफेक्ट लुक

image credit: pexels

हिवाळ्याच्या ऋतुला सुरुवात होताच प्रत्येकजण बाहेर फिरायला जाण्याची योजना आखत असतो. बाहेर फिरायला जाण्यासाठी वेगवेगळे लूक्स आधीच प्लॅन करावे लागतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, शॉल हे हिवाळ्यातील एक सामान्य पोशाख आहे. पुरुष असो वा महिला, प्रत्येकजण त्यांना आपापल्या पद्धतीने स्टाईल करतो. ते केवळ तुमचा लूक स्टाईल करण्यात नाही तर थंडीपासून तुमचे रक्षण करण्यास देखील कामात येतात.

 बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे शॉल मिळतील, ज्यामध्ये अनेक प्रकार, रंग आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत. विशेषतः पश्मीना शॉलला भारतात खूप मागणी आहे, कारण ती अत्यंत उबदार आणि महाग असते. हे काश्मीरच्या पारंपारिक कपड्यांपैकी एक आहे. मात्र, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला हलक्या, मऊ आणि पातळ असून उबदार शॉलबद्दल माहिती देणार आहोत. 

Also Read: Winter Shopping tips: थंडीपासून बचावासाठी नवे गरम कपडे खरेदी करताय? 'अशा'प्रकारे स्टाईल करा विंटर लुक

याक वूल शॉल

पश्मिनाप्रमाणे याक वूल शॉल खूप उबदार असतात. याक लोकरीचे शाल सर्वात उबदार, टिकाऊ आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक मानले जातात. तुम्ही शून्यापेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणीही त्यांचा वापर करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या शाली विविध डिझाइनमध्ये येतात, ज्यात लोकल डिझाईन, आदिवासी डिझाइन इ. प्रकार आहेत. या शाली स्टाईल केल्यानंतर तुम्ही उबदार जॅकेट घातले आहे, असे जाणवेल. 

कुल्लू शॉल 

कुल्लू शॉल हिमाचलमधील खूप लोकप्रिय पोशाख आहे. ही शॉल आपल्या उत्कृष्ट नमुन्यांसाठी देशभरात ओळखली जाते. ही शॉल इतकी मऊ असते की, तुम्हाला अंगावर ओझे अजिबात जाणार नाही. ही शॉल मऊ असली तरीही अविश्वसनीयपणे उबदार आहे. तुम्ही ही शॉल दररोज वापरू शकता. महत्त्वाचे म्हणजे ही शॉल बजेट-फ्रेंडली आहे. 

मेरिनो वूल शॉल 

या हिवाळ्यात तुमच्या कलेक्शनमध्ये मेरिनो वूल शॉलचा समावेश करा. तुम्ही ही शॉल घरी, ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी सहज स्टाईल करू शकता. शॉलच्या खास वैशिष्ट्यांमध्ये घाम रोखणे, श्वास घेण्याची क्षमता आणि शरीराच्या तापमानाचे संतुलन यांचा समावेश आहे. ही विशेषतः तरुणांसाठी बनवण्यात आली ते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या शॉल काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात देखील हाताने विणल्या जातात. 

अंगोरा वूल शॉल 

अंगोरा वूल शॉल देखील मऊ, उबदार असून क्लासी आणि आकर्षक दिसतात. ही शॉल परिधान केल्याने तुम्हाला कापसाच्या लोकरीने गुंडाळल्यासारखे वाटेल. लक्षात घ्या की, ही शॉल सशाच्या लोकरीपासून बनवली जाते. तसेच, या शालींची निर्मिती देखील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रदेशांत केली जाते. या सहलीचे देखील अंगावर ओझे जाणवत नाही आणि शरीराला उब देखील मिळते. 

image credit: Istock