Winter Shopping tips: थंडीपासून बचावासाठी नवे गरम कपडे खरेदी करताय? 'अशा'प्रकारे स्टाईल करा विंटर लुक


गुलाबी थंडीला अखेर सुरुवात झाली आहे. वातावरणात आता गारवा देखील जाणवत आहे. अशा परिस्थितीत, तुमचे कपडे आणि आहार समायोजित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर, बहुतेक लोकांनी आधीच हिवाळ्यातील उपकरणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आजकाल हुडीज, स्वेटर, जॅकेट आणि अनेक आकर्षक विंटर आऊटफिट्स बाजारात दिसतात. आता थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासोबत स्टायलिश लूक राखणे देखील महत्त्वाचे आहे. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करताना आकर्षक लूक कसे स्टाईल करता येईल? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

लेयरिंगवर लक्ष द्या. 

हिवाळ्यात स्टायलिश लूक मिळवण्यासाठी लेयरिंग करणे खूप महत्वाचे आहे. अर्थात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि क्लासी लूक मेंटेन करण्यासाठी कपड्यांचे लेअरिंग करा. आतमध्ये थर्मल्स आणि बॉडी-फिटिंग इनर घालून सुरुवात करा.  नंतर हलके स्वेटर किंवा पुलओव्हर आणि त्यावर जॅकेट किंवा कोट घालता येईल. लेयर्सचे कलर्स एकमेकांना सूट व्हायला हवेत, याबद्दल काळजी घ्या. 

फॅब्रिक 

हिवाळ्यात योग्य फॅब्रिक निवडणे खूप महत्वाचे आहे. असे फॅब्रिक निवडा, जे तुम्हाला केवळ उबदारच ठेवणार नाहीत तर तुमचे व्यक्तिमत्व देखील वाढवतील. यासाठी तुम्हाला बाजारात पॉलिस्टर, फ्लानेल, मखमली, ट्वीड आणि फॉक्स फरसह लोकरीचे अनेक प्रकार मिळतील. लेदर किंवा डेनिम हे देखील उत्तम फॅब्रिक आहेत. 

जॅकेट्स आणि कोट्स 

हिवाळा फॅशनेबल जॅकेट आणि कोटशिवाय अपूर्ण आहे. ते केवळ थंडीपासून तुमचे रक्षण करत नाहीत तर तुम्हाला आकर्षक देखील बनवतात. यासाठी लेदर जॅकेट, ट्रेंच कोट, ब्लेझर आणि पफर जॅकेट सारखे पर्याय उपलब्ध आहेत. हिवाळ्यासाठी तुम्ही चार ते पाच हाय कॉलिटीचे जॅकेट आणि कोट खरेदी करू शकता. तुमच्या ट्राउझर्स किंवा जीन्सचा कलर लक्षात घेऊन कॉन्ट्रास्ट लुक स्टाईल करता येईल. 

फूटवेअर 

तुमचा लूक वाढवण्यात फूटवेअर्स देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यासाठी तुम्ही अँकल बूट्स, नी लेंथ बूट किंवा लॉन्ग बूट्स सर्वोत्तम आहेत. लेदर शूज किंवा स्नीकर्स देखील एक चांगले पर्याय ठरतील. वाईड जीन्स किंवा बॉडीकॉन ड्रेससह लॉन्ग बूट चांगले पर्याय आहेत. 

बॉडी टाईप 

तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपवर लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक पोशाख सर्व बॉडी टाईपला शोभत नाही. म्हणून तुमच्या शरीरयष्टीनुसार कपडे निवडा. पफर जॅकेट आणि ओव्हरसाईज स्वेटर स्लिम लोकांना छान दिसतील. परंतु हेल्दी लोकांना ते शोभत नाहीत. म्हणून, बॉडी टाईपबद्दल विशेषतः काळजी घ्या. 

image credit: pexels