Depression: डिप्रेशनमध्ये नक्की काय होते? व्यक्तिमत्त्वात कुठला बदल होतो? तुमच्यासोबत आज मलाही मिळेल उत्तर


उदासीनता म्हणजेच तरुणाईचा आवडता शब्द 'डिप्रेशन'. आता काहीही नकारात्मक झाले तरीही एक शब्द आवर्जून वापरला जातो, तो म्हणजे डिप्रेशन'. हा शब्द एक समस्याच झाली आहे. डिप्रेशन लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. नैराश्याने ग्रस्त असलेली व्यक्ती पूर्णपणे बदलते. मात्र, डिप्रेशनचा अर्थ नक्की काय? हा प्रश्न तुमच्यासोबत मला देखील अनेकदा पडतो. नक्की काय होत असेल बर? एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जातो, म्हणजे नक्की काय बदल होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आजची बिझी लाइफस्टाइल, रिलेशनशिप इशूज, करिअर इ. मुळे बरेच लोक नैराश्याला बळी पडत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मात्र, अजूनही लोकांना नैराश्याची पूर्णपणे जाणीव नाही. जर नैराश्य दीर्घकाळ टिकले तर त्यातून सावरणे कठीण असते. तुम्ही काही सवयी ओळखू शकता आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या समस्येचा सामना करावा लागत आहे का? हे ठरवून त्याला पूर्णपणे साहाय्य करू शकता. 

लगेच राग येणे. 

जे लोक शांत असतात, परंतु अचानक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल जाणवतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात. त्याला आपण डिप्रेशनचे कारण समजू शकतो. असे लोक खूप लवकर चिडतात आणि सतत निराश दिसतात. डिप्रेशनमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये हा एक मोठा आणि सामान्य बदल आहे. कधीकधी हा राग खूप धोकादायक देखील बनू शकतो. जसे की, समोरच्या व्यक्तीवर जास्त ओरडणे, वस्तू फेकणे आणि राग आल्यावर हात आणि पाय थरथरणे. हे डिप्रेशनचे लक्षण मानले जाऊ शकते. 

आवडत्या गोष्टींमधील रस नाहीसा होणे. 

 डिप्रेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे त्याच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्याच रस कमी होणे. त्याच्या आवडत्या गोष्टी पाहताना त्याला पूर्वी वाटणारा उत्साह नसतो. या स्थितीला अँहेडोनिया असे म्हणतात. त्याला सर्व काही चुकीचे वाटते. आम्ही तुम्हाला सांगतो की, 18 ते 29 वयोगटातील लोकांमध्ये हे सर्वात सामान्य आहे.

खूप हट्टी होणे. 

डिप्रेशचा अनुभव घेतल्यानंतर काही लोक खूप हट्टी होतात. त्यांना असे वाटते की, ते त्यांची मनःस्थिती, वर्तन आणि कृती यांवर काही नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. ते फक्त त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू इच्छितात. यामुळे कधीकधी चुका देखील, ज्याने डिप्रेशनमधील व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. 

अजिबात ऍडजस्ट न करणे. 

नैराश्यात असताना लोक स्वतःला अलिप्त ठेवतात. या अलिप्तपणामध्ये ते कोणत्याही गोष्टीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, त्यांना कौटुंबिक मेळाव्यांमध्ये जाणे आवडत नाही. तसेच, ते मित्रांशी बोलताना नावडत्या विषयांवर लगेच चिडतात. नैराश्यग्रस्त व्यक्तीने पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता अजिबातच रस नसतो. त्यांना सर्व काही त्यांच्या विरुद्ध असल्यासारखे भासत असते. 

टीप: वरील माहिती तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. जर तुम्हाला देखील या माहितीचा अवलंब करायचा असेल तर त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

image credit: pexels