डॉ. APJ अब्दुल कलाम हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, विद्यार्थ्यांना नेहमीच त्यांचे आदर्श पुढे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. कलाम हे एक भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. डॉ. कलाम 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती या पदावर कार्यरत होते. त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणूनही संबोधले जाते. होय, ते एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध होते.
डॉ. APJ अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व असे होते की, त्यांनी अनेक तरुणांचे जीवन बदलून टाकले. आजही त्यांचे विचार लाखो तरुणांना प्रेरणा देतात. तुम्ही देखील तुम्हाला मिळत असलेल्या सततच्या अपयशाने हताश आणि निराश झाले असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला डॉ. कलाम यांचे काही प्रेरणादायी विचार आणि शिकवण सांगणार आहोत. हे विचार आणि शिकवण तुम्हाला कठीण काळात प्रोत्साहन देण्यास मदत करतील.
एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार (मराठी)
- तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यापूर्वी, तुम्हाला ती स्वप्ने पहावी लागतात.
- श्रेष्ठता ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, अपघात नाही.
- लहान ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे, उच्च ध्येय ठेवा.
- जीवन हा एक कठीण खेळ आहे. तुम्ही फक्त माणूस असण्याचा तुमचा जन्मजात अधिकार कायम ठेवूनच तो जिंकू शकता.
- जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर प्रथम सूर्यासारखे जळा.
- जे मनापासून काम करू शकत नाहीत, त्यांना मिळणारे यश पोकळ आणि अपूर्ण असते. यामुळे आजूबाजूला कटुता पसरते.
- माणसांच्या आयुष्यात अडचणी पाहिजेत. या अडचणींमुळेच यशाचा आनंद घेता येईल.
- आकाशाकडे पहा. आपण एकटे नाही आहोत. संपूर्ण विश्व आपले मित्र आहे आणि त्यालाच सर्व मिळतं, जे स्वप्न पाहतात आणि कठोर परिश्रम करतात.
- तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण जर तुम्ही दुसऱ्यांदा अपयशी ठरलात, तर तुमचा पहिला विजय फक्त नशीब होता हे म्हणण्यासाठी आणखी ओठ वाट पाहत असतील.
- शोध लावण्याचे, अज्ञात मार्गांवर प्रवास करण्याचे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शोधण्याचे आणि यश मिळविण्यासाठी आव्हानांवर मात करण्याचे धाडस करा.
image credit: getty images