प्रत्येकाची एखादी आवडती ड्रिंक असते, जी त्यांच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग असते. यापैकी बहुतेक ड्रिंक्स आरोग्यदायी असतात, या ड्रिंक्सच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे या ड्रिंक्स सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. काही लोक ब्लॅक कॉफी पसंत करतात कारण ती कडक आणि ऊर्जा देणारी असते. इतर लोक माचा टी पसंत करतात, कारण ही ड्रिंक बनवण्याची पद्धत मनाला शांत करते. बहुतेक लोक 'ग्रीन टी' पितात कारण हा हर्बल चहा असतो. आयुर्वेदानुसार, यामुळे शरीराला दुप्पट फायदे देखील मिळतात. बघुयात कोणते ड्रिंक आहे तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट...
ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफी गट मोटिलिटी सुधारते. ती पोटातील आम्लावर परिणाम करते, ज्यामुळे पचनसंस्थेला अन्न योग्यरित्या पचवता येते. दररोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास, ब्लॅक कॉफी पोट स्वच्छ करण्यास देखील मदत करते. ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी दररोज ब्लॅक कॉफी प्यावी, कारण ती शरीरात साचलेली घाण बाहेर टाकण्यास मदत करते, असे तज्ज्ञ सांगतात. ज्यांना आधीपासूनच GRED, गॅस्ट्रिक किंवा IBS चा त्रास आहे, त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच ब्लॅक कॉफी प्यावी.
ग्रीन टी
आता तुम्ही श्रद्धा कपूरच्या ऍडमध्ये पहिलेच असेल की, वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणासाठी ग्रीन टी पिणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढून आपल्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांना (गट मायक्रोबायोम) फायदा होतो. दाहशामक असण्याव्यतिरिक्त त्यात पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात.
दीर्घकाळ टिकणाऱ्या दाह-प्रक्रियेमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो आणि अशा समस्यांशी लढण्यासाठी ग्रीन टीचे गुणधर्म अत्यंत प्रभावी आहेत. ग्रीन टी ही ब्लॅक कॉफीपेक्षा जरा चांगला पर्याय आहे कारण त्यात कॅफीनचे प्रमाण कमी असते. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठीही हे योग्य आहे, परंतु त्याचे देखील योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. सेवन सुरु करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
माचा टी
आजकाल या माचा ग्रीन टी पिणे खूप लोकप्रिय झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ग्रीन टी पावडरपासून बनवलेले एक जपानी पेय आहे. हे पोषक तत्वांनी समृद्ध असून त्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये कॅटेचिन्स आणि इतर बायोॲक्टिव्ह संयुगे असतात. यामध्ये एल-थिएनाइन नावाचे एक अमिनो ॲसिड असते, जे नैसर्गिकरित्या शरीराला आराम देते आणि तणाव कमी करते. याच्या सेवनाने आपली पचनसंस्था देखील सुधारते. याचे अतिसेवन केल्यास ॲसिडिटी होऊ शकते.
कोणती आहे बेस्ट ड्रिंक?
- सर्वसाधारणपणे, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो किंवा ज्यांना कॅफीन हानिकारक वाटत नाही, त्यांनी ब्लॅक कॉफी माफक प्रमाणातच प्यावी.
- ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे, परंतु जर तुम्हाला नियमितपणे याचे पालन करायचे असेल, तर तज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे.
- मात्र, या ड्रिंक्सना आरोग्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठीचा एक चमत्कारिक उपाय मानणे हा काही उपाय नाही. तुम्ही फायबरने समृद्ध आणि संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे.
टीप: वरील सांगितलेल्या माहितीचा अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: pexels