मैत्रिणींनो! चेहरा आणि हाताची निगा तुम्ही नेहमीच घेता, पण पायांचा काय? होय, अनेकदा मुली पायांच्या स्किनकेयरकडे लक्ष देत नसल्याने त्यांचे पाय घाण आणि काळपट दिसू लागतात. उन्हात फिरणे, धूळ, टॅनिंग अशा अनेक कारणांमुळे तुमचे पाय काळपट दिसू लागतात. दिवसभरात तुमच्या पायांच्या त्वचेला सर्वाधिक धूळ, घाम आणि सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागतो. पण त्यांना आवश्यक असलेली काळजी मिळत नाही. यामुळेच त्वचेवर काळपटपणा जमा होतो आणि त्वचेची नैसर्गिक चमक नाहीशी होते.
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात, परंतु त्यातील रसायने प्रत्येकाच्या त्वचेला अनुकूल असतीलच असे नाही. अशा परिस्थितीत, घरगुती उपाय एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय म्हणून समोर येतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले लिंबू, बेसन, दही किंवा मध यांसारखे सामान्य घटक केवळ त्वचेला आतून पोषणच देत नाहीत, तर हळूहळू काळपटपणा दूर करून पायांचा रंग सुधारतात आणि नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत होते.
Also Read: Skincare by Watermelon in Summer: स्क्रबिंग ते आईस क्यूब! कलिंगडच्या सालीने करा बेस्ट स्किनकेयर
चला तर मग जास्त वेळ न घालवता पायांचा काळपटपणा आणि टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय पाहुयात:
लिंबू आणि शहद
तुम्ही तुमचे पाय पुन्हा उजळ करण्यासाठी लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे टॅनिंग आणि काळे डाग हलके करण्यास मदत करतात, तर मध त्वचेला खोलवर मॉइश्चर देतो. हे मिश्रण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ व मऊ बनवते. यासाठी फक्त 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध एकत्र मिसळा आणि ते तुमच्या पायांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
| image credit: istock |
बेसन आणि दही
पाय उजळ करण्यासाठी बेसन आणि दह्याचा पॅक हा एक बेस्ट पर्याय मानला जातो. बेसन एक उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रब आहे, जो घाण आणि मृत त्वचा काढून टाकतो. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड त्वचा उजळ आणि स्मूथ करतो. 2 चमचे बेसन आणि 1/2 चमचा दही एकत्र करून पेस्ट बनवा आणि ती पायांना लावा. ती सुकल्यावर, हलक्या हाताने स्क्रब करा आणि धुवून टाका. हा पॅक लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ दिसेल, कांती उजळ होईल आणि कोरडेपणा देखील कमी होईल.
तांदळाचे पीठ आणि गुलाबजल
तांदळाचे पीठ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक उत्तम स्क्रब आहे. यासह गुलाबजल त्वचेला ताजेपणा देऊन तिचा टोन सुधारतो. यासाठी फक्त २ चमचे तांदळाचे पीठ आणि पेस्ट बनवण्यासाठी पुरेसे गुलाबजल एकत्र करा. ही पेस्ट तुमच्या पायांना लावा, हळुवारपणे स्क्रब करा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा स्मूथ आणि सॉफ्ट होते, टॅनिंग कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.
दूध आणि हळद
हळद आणि दुधाचे मिश्रण तुमचे पाय उजळ करण्यास मदत करते. हळदीमध्ये जिवाणूनाशक आणि त्वचा उजळ करणारे गुणधर्म आहेत, तर दूध त्वचेचे पोषण करून तिला उजळ करते. 1 चिमूटभर हळद 2/3 चमचा दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि ती तुमच्या पायांना लावा. 15 मिनिटांनंतर ते धुवून टाका. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि डाग व काळे ठिपके हलके होण्यास मदत होते.
image credit: pexels