उन्हाळ्यातील कडाक्याच्या गर्मी मनाला आणि शरीराला गारवा देणारे फळ म्हणजे कलिंगड/टरबूज होय. होय, कलिंगड उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ आहे. कलिंगड केवळ गारव्यासाठीच नाही तर, याद्वारे तुम्हाला स्किनकेयरदेखील करता येईल. कलिंगडाच्या सालीचा स्किनकेयरसाठी अनेक प्रकारे उपयोग करता येतो. बहुतेक लोक त्या निरुपयोगी आहेत असे समजून फेकून देतात. टरबूजाच्या सोललेल्या भागातून हिरवी साल काढता येते आणि पांढऱ्या भागाचा अनेक कामांसाठी उपयोग करता येतो. त्याचा उपयोग लोणचे, जॅम किंवा थालीपीठ इ. बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. या लेखात, आम्ही स्किनकेयरसाठी कलिंगडच्या सालींचा वापर कसा करायचा? याबद्दल माहिती देणार आहोत. 💓
Also Read: Black coffee, Green tea की Matcha? कोणती ड्रिंक आहे बेस्ट? काय सांगतात तज्ज्ञ
Skincare by Watermelon। कलिंगडद्वारे स्किनकेयर
कलिंगडचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाण्याचे प्रमाण असते. कडक उन्हातही योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि यासह आपले उष्माघातापासून आपले संरक्षण होते. प्राचीन काळी, टरबूज आणि खरबूज यांसारखे पदार्थ उष्णतेवर सर्वोत्तम उपाय मानले जात होते. आजही लोक उष्णतेवर मात करण्यासाठी या पदार्थांचे सेवन करतात.
गर्मीमध्ये कलिंगडद्वारे स्किनकेयर
टरबूजच्या साली: कलिंगड खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देऊ नका. तुम्ही ती तुमच्या हातांवर चोळू शकता. तुम्ही ती चेहऱ्यावरदेखील चोळू शकता. पण त्यासाठी चेहऱ्यावर लहान ठिपक्याने पॅच टेस्ट करणे, आवश्यक आहे. अशा प्रकारे, कलिंगडातील पाणी तुमच्या त्वचेला आर्द्रता देते. कलिंगडाच्या सालीचे हे आर्द्रता देणारे गुणधर्म तुमची त्वचा तीव्र उष्णतेपासून सरंक्षित करू शकतात.
हायड्रेटिंग आईस क्यूब
कलिंगडाच्या सालीवरील हिरवी साल काढून झाल्यावर, पांढरा भाग एका भांड्यात ठेवा. हा पांढरा भाग व्यवस्थित कुस्करून त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर, त्याचे आईस क्यूब तयार करा. अशा प्रकारे, तुम्ही त्वचेला आर्द्रता देणारे आईस क्यूब बनवू शकता. दिवसातून एकदा हे क्युब्स चेहऱ्यावर चोळा.
स्क्रब
तुम्ही स्क्रबसाठी देखील टरबूजाच्या सालींचा वापर देखील करू शकता. या पेस्टमध्ये थोडी कॉफी मिक्स करा. हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर आणि हातांना लावा आणि मसाज करा. हे उपाय वापरण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
एलोवेरा जेल
कलिंगडाची साल कोरफड जेलमध्ये मिक्स करुन त्वचेवर लावता येते. टरबूजाचा मधला भाग खाल्ल्यानंतर, हिरवी साल बाहेरील सालीपासून वेगळी करून घ्या. आता पांढरा भाग एका वाटीत घ्या आणि त्यात कोरफड जेल मिक्स करा. झोपण्यापूर्वी ही पेस्ट आपल्या हातांना आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराइज राहील आणि त्यावर नॅचरल ग्लो येईल.
Image credit: pexels