Weight loss tips: झटपट वजन कमी करण्यासाठी हे 5 पॉप्युलर डाएट



वजन कमी करणे ही एक स्लो प्रोसेस आहे ज्यासाठी सातत्य आवश्यक असते, म्हणजेच तुम्ही तुमच्या आहारापासून ते व्यायामापर्यंत प्रत्येक गोष्टीचे पालन केले पाहिजे. बरेचदा अधिक काळापर्यंत नियमांचे पालन करणे अवघड जाते. अधिक काळ संयम ठेवणे खूप अवघड आहे आणि म्हणूनच झटपट वजन कमी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. सोशल मीडियावरही अनेक उपाय सांगितले जातात, ज्यांचे लोक अनेकदा पालन करतात. झटपट वजन कमी करण्यासाठी तयार केलेले अनेक लोकप्रिय वेट लॉस डाएट आहेत.

कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी, त्याबद्दल योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तज्ञाचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी पुढील डाएट सर्वात लोकप्रिय आहेत.

इंटरमिटंट फास्टिंग (खंडित उपवास)

जलद वजन कमी करण्यासाठी सर्वात पॉप्युलर डाएट म्हणजे 'इंटरमिटंट फास्टिंग' पद्धत होय. ही खाण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये केव्हा खायचे आणि केव्हा नाही हे ठरवले जाते. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 16 तास उपवास केला जातो आणि त्यानंतर 8 तास खाल्ले जातात. म्हणजेच 24 तासांच्या कालावधीत, तुम्ही सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत खाऊ शकता आणि उर्वरित वेळ उपवास करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही इतर कोणताही कालावधी देखील निवडू शकता. सुरुवातीला, उपवासाचे तास कमी ठेवावेत.



लो कार्ब डाएट 

या आहारात साखर, पास्ता, रिफाइन्ड पिठापासून बनवलेला ब्रेड, भात, बटाटे, मका किंवा कोणतेही स्टार्चयुक्त पदार्थ यांसारखे साधे कार्ब्स पूर्णपणे वगळले जातात. याव्यतिरिक्त, आहारात प्रोटिन्स, गुड फॅट्स आणि व्हिटॅमिन्स व खनिजे यांनी समृद्ध पदार्थांचा समावेश केला जातो. यामध्ये अंडी, मांस, मासे, हिरव्या पालेभाज्या, बिया, सुकामेवा आणि ऑलिव्ह ऑइलसारख्या आरोग्यदायी फॅट्सचा समावेश होतो. सुरुवातीला, यामुळे मानसिक ताण वाढू शकतो, म्हणून तज्ञांचा सल्ला घेणे आणि योग्य डाएट टाइमटेबल तयार करणे महत्त्वाचे आहे.

केटो डाएट

जलद वजन कमी करण्यासाठी केटो डाएट देखील खूप लोकप्रिय आहे. यामध्ये कार्ब्स मोठ्या प्रमाणात कमी केली जातात आणि फॅट वाढवली जाते. केटो डाएटमध्ये मूलतः कमी कर्बोदके आणि जास्त चरबीयुक्त आहाराचे पालन केले जाते. जेव्हा तुम्ही कर्बोदकांचे सेवन मोठ्या प्रमाणात कमी करता, तेव्हा तुमच्या शरीरातील चरबीचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते. 

OMAD डाएट 

वजन कमी करण्यासाठीच्या OMAD डाएटबद्दल बोलायचे झाल्यास, हा मूलतः इंटरमिटंट फास्टिंगचाच एक प्रकार आहे. OMAD म्हणजे 'वन मील अ डे', म्हणजेच दिवसातून एकदाच जेवण. तुमचे जेवण एकाच ताटात वाढले पाहिजे. तुम्हाला जेवण्यासाठी एक तास मिळतो, म्हणजेच अंदाजे २३ तासांचा उपवास होतो. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. या डाएटमुळे अशक्तपणा येऊ शकतो. तुम्ही याचे पालन करत असलात तरी, तुमच्या ताटात अशा पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा, जे पुरेसे पोषक तत्वे पुरवतात.

VLCD डाएट 

 VLCD म्हणजेच व्हेरी लो-कॅलरी डाएट होय. हा कॅलरीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करणारा आहार आहे, यामुळेच वेगाने वजन कमी होते. या आहारात दररोजच्या कॅलरीजचे सेवन 800 ते 1000 पर्यंत मर्यादित ठेवले जाते. त्यामुळे, याचे पालन केवळ तज्ञांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे, कारण यामुळे तीव्र अशक्तपणा येऊ शकतो. हा आहार बहुतेकदा जास्त वजन असलेल्या लोकांकडून पाळला जातो.

Disclaimer: वरील सर्व प्रकारचे आहार पालन करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.