Met Gala 2026: मेट गाला 2026 सुरू झाला आहे. या फॅशन इव्हेंटमध्ये जगभरातील सेलिब्रिटी त्यांच्या अनोख्या पोशाखांनी रेड कार्पेटवर ग्लो करतात. त्यांच्यापैकीच एक आहे ईशा अंबानी, जी अनेक वर्षांपासून मेट गालामध्ये आपल्या अनोख्या लूक्ससह येत असते. या मेगा इव्हेंटमध्ये हॉलीवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या फॅशनने सर्वांना प्रभावित करतात, तर यावेळी ईशा अंबानीने तिच्या राजेशाही लूकने सर्वांना थक्क केले. सोशल मीडियावर सर्वत्र इशाच्या मेट गाला लुकची चर्चा सुरु आहे.
Also Read: नवा ट्रेंड! गर्मीसाठी बेस्ट आहे Micro Travel-Maximum Relax, नक्की काय आहे ट्रेंड?
सोनेरी साडी, हातात फ्लोअर टच गजरा आणि मँगो शेपची अनोखी पर्स यामुळे इशा अंबानींचा लुक आणखी रॉयल झाला. ईशा अंबानीचा संपूर्ण लूक राजेशाही असूनही सौम्य आणि मोहक होता. तिने या लुकमद्ये प्रत्येक डिटेलची काळजी घेतली असल्याचे दिसत आहे. मग ते साडीचे टेक्स्चर असो, दागिन्यांची निवड असो किंवा तिने घेतलेली मँगो पर्स असो. चला तर मग जास्त वेळ न घालवता इशा अंबानीच्या अनोख्या लुकबद्दल जाणून घेऊयात:
ईशा अंबानीचा मेट गाला लूक
ईशा अंबानीच्या मेट गाला लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने फॅन्सी टचसह गोल्डन टिशू सिल्क साडी परिधान केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला तिचा हा पोशाख अत्यंत मौल्यवान होता. मात्र महत्त्वाचे लक्षात घ्या की, ईशाच्या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा हिरे आणि पाचू जडवलेला ब्लाउज होता.
इशाचा मौल्यवान ब्लाउस
या लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे रत्नजडित ब्लाउज, जो नीता अंबानींच्या वैयक्तिक संग्रहातील मौल्यवान पारंपरिक रत्नांनी जडवलेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ब्लाउजमध्ये 1800 कॅरेटपेक्षा जास्त हिरे, तसेच नाजूक पाचू, पोलकी आणि कुंदन यांचा वापर केला आहे. ईशाने यासोबत हॅण्डमेड गोल्डन टिशू साडी परिधान केली होती, जिचा काठ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या स्वदेश कारागिरांनी हाताने रंगवला होता आणि एका कार्यशाळेत त्यावर भरतकाम केले होते.
साडीवरील डिझाईन अजिंठा भित्तिचित्रांपासून प्रेरित आहे, जी भारतीय कलेतील साडीच्या सर्वात जुन्या चित्रणांपैकी एक मानली जाते. या लूकमध्ये एका शिल्पकलेसारख्या रेझिन-ड्रेप केलेल्या केपने भर घातली. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही साडी तयार करण्यासाठी अंदाजे 1200 तास लागले आणि त्यात 50 हून अधिक कारागिरांच्या श्रमाचा समावेश होता.
फ्लोअर टच गजरा
ईशा अंबानीने तिच्या दोन्ही हातांवर आणि केसांमध्ये गजरे बांधून तिच्या साडीला ट्रेडीशनल टच दिला आहे. कृत्रिम फुलांपासून बनवलेला हा गजरा गौरव गुप्ता यांनी 150 तासांच्या कालावधीत हाताने तयार केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या निर्मितीमध्ये कागद, तांबे आणि पितळ यांचा वापर करण्यात आला होता. तिने केसांचा अर्धवट अंबाडा घातला होता आणि जमिनीपर्यंत लांब गजरा बांधला होता, ज्यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. गजरा इतका लांब होता की, चालताना तिने तो हाताभोवती गुंडाळला होता.
ज्वेलरी आणि मँगो पर्स
ईशाच्या सोनेरी साडीने निश्चितच सर्वांना प्रभावित केले, पण तिच्या हातातल्या मँगो पर्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, ईशाने प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी डिझाइन केलेली आंब्याच्या आकाराची पर्स घेतली होती. दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ईशाने तिच्या आई नीता अंबानी यांचे दागिने परिधान केले होते.
तिने 250 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे, उत्तम प्रकारे डिझाइन केलेले दोन ओल्ड माइन-कट नेकलेस घातले होते. यासह, तिने ओल्ड माइन-कट हिऱ्याचे कानातलेही घातले होते. याव्यतिरिक्त, ईशाने मध्यभागी पाचू असलेला एक आकर्षक नेकपीस देखील घातला होता. तिने हिऱ्याच्या अंगठ्या घालून आपला अनोखा लूक पूर्ण केला.
image: instagram