उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याची समस्या अनेकांना भेडसावते. केवळ उन्हानेच नाही तर सतत बाहेर पडल्यानंतर धूळ, प्रदूषण इ. ने देखील टॅनिंगची समस्या होत असते. साधारणतः त्वचा टॅनिंगपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. तरीही, दररोज सनस्क्रीन लावूनही काही लोकांना त्वचा काळवंडण्याची समस्या भेडसावते. त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु ती वेळीच दूर केली नाही तर त्वचा कायमची डार्क होऊ शकते. वर सांगितल्याप्रमाणे, उष्णता, कडक सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे त्वचेवर टॅनिंग होते. सनस्क्रीनद्वारे हे टाळता येते. मात्र, अनेकदा सनस्क्रीनचा देखील टॅनिंगवर काही परिणाम होत नाही, असे का होते? तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
टॅनिंग होण्याची कारणे
तज्ञांच्या मते, अतिनील किरणे म्हणजेच UV rays आपल्या त्वचेतील मेलॅनिनचे प्रमाण वाढवण्यात भूमिका बजावतात. सूर्यप्रकाश किंवा तीव्र उष्णतेमुळे त्वचा काळवंडते. सनस्क्रीन त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करते. तरीही, दररोज सनस्क्रीन लावूनही काही लोकांना त्वचा काळवंडण्याचा अनुभव येतो.
सनस्क्रीन लावूनही टॅनिंगचा त्रास का होतो?
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, नियमितपणे सनस्क्रीन लावूनही त्वचा काळवंडल्याची तक्रार अनेक लोक करतात. याचे कारण बहुतेकदा पुरेसे सनस्क्रीन न लावणे हे असते. तज्ज्ञांच्या मते, सनस्क्रीन लावताना बहुतेक लोक आणखी एक चूक करतात, ती म्हणजे ते वारंवार पुन्हा लावत नाहीत. खरं तर, सनस्क्रीन दिवसातून किमान दोनदा लावले पाहिजे. अनेकांना असे वाटते की, एकदा दिवसातून लावल्यावर ते पुन्हा लावण्याची गरज नसते.
तज्ज्ञ म्हणतात की, SPF आणि PA रेटिंग्ज त्वचेच्या गरजा पूर्णपणे दर्शवत नाहीत. सनस्क्रीन लावण्यापूर्वी SPF आणि PA चा विचार करणे महत्त्वाचे आहे. हे दोन्ही घटक टॅनिंग टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी पुढे सांगितले की, जास्त वेळ उन्हात राहणे, घाम येणे आणि अतिनील किरणांच्या संपर्कात येणे यामुळे देखील टॅनिंग होऊ शकते.
टीप: वरील माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्यापूर्वी आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
image credit: pexels