चेहरा धुताने चेहऱ्यावरील डस्ट आणि ऑइल काढण्यासाठी तुम्ही फेसवॉश वापरता. पण यांनंतरही तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा स्वच्छ आणि ऑइल फ्री दिसत नाही. फेसवॉशचा योग्य पद्धतीने वापर न केल्यामुळे असे परिणाम दिसतात. दिवसभर धावपळ करून दमून संध्याकाळी घरी आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर धूळ साचलेली असते आणि एक्सट्रा ऑइल सुद्धा दिसून येतो. या डस्ट आणि ऑइलला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फेसवॉश किंवा साबणाने चेहरा धूउन घेता. पण चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत ही नाही, जर तुम्ही योग्य पद्धतीने चेहरा धुणार तर तुमची त्वचा अधिक तजेलदार दिसेल.
जर तुम्ही चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करत असाल तर त्वरित ही सवय बदलून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्याला हानि होते. शरीरापेक्षा चेहऱ्यावरील त्वचा ही जास्त कोमल असते आणि साबण रसायनयुक्त असतात. साबणामुळे चेहऱ्यावरील त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चर टिकून राहत नाही, त्वचा डल आणि कोरडी पडते. म्हणूनच चेहरा धुण्यासाठी नेहमी उत्तम दर्जाचे फेसवॉश वापरावे.
घाम येणे किंवा तेलकट त्वचा असणे अशा समस्यांमुळे काही स्त्रिया दिवसभरातून खूप वेळा चेहरा धूत असतात. पण तज्ज्ञांच्या मते दिवसभरातुन फक्त दोनदा चेहरा धुणे योग्य असते. एकदा आंघोळ करताना आणि संध्याकाळी घरी परतल्यानंतर किंवा झोपायच्या आधी. याशिवाय ज्या महिलांची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल त्यांनी दिवसातून एकदाच आपला चेहरा धुवावा. जर दिवसा तुमचा चेहरा चिकट होत असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा. ब्लॉटिंग पेपर तुमच्या चेहऱ्यावरील चिकटपणा, ऑइल आणि इतर घाण स्वच्छ करेल.
योग्य पद्धत:
- चेहरा धुण्यासाठी आधी, कोमट पाण्याने चेहरा ओला करा.
-कोमट पाण्याने आपल्या त्वचेचे पोअर्स ओपन होतात, जेणेकरून त्वचेमध्ये जमा झालेले एक्सट्रा ऑइल आणि घाण सहजपणे स्वच्छ होते.
- हातावर योग्य प्रमाणात फेसवॉश घेऊन चेहऱ्यावर लावा. एक मिनिट चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मालिश करा.
- त्यानंतर थंड्या पाण्याने चेहरा स्वच्छ धून घ्या.
- थंड्या पाण्याने स्कीन पोअर्स बंद होतात, त्यामुळे घाण त्वचेच्या आत जाऊ शकत नाही.
-शेवटी मऊ कापडाने चेहऱ्यावर थाप मारून चेहरा कोरडा करा.
- फेस वॉश केल्याने चेहरऱ्यावरील ऑइल निघतो, चेहरा धून त्यावर टोनर किंवा फेस मॉइश्चरायझर लावा.
प्रत्येक स्त्रीचा स्किन टाईप हा वेगळा असतो. त्यानुसार आपल्यासाठी प्रोडक्ट्स निवडून घ्या. जर तुम्हाला तुमच्या स्किन टाईप बद्दल माहिती नाही, तर तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी वापरले जाणारे प्रोडक्टस घ्या.
याबद्दल काळजी घ्या:
- हातावरील घाण चेहऱ्यावर जाता कामा नये यासाठी चेहरा धुण्याआधी हात स्वच्छ धुवावे.
- काही स्त्रिया मेकअप रिमूव्ह न करता चेहरा धुतात त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते म्हणून मेकअप रिमूव्ह करून नंतरच चेहरा धुवावा.
Tags:
Skincare