'या' खास टिप्सनुसार गॉगल्सची निवड करा आणि मिळवा 'मोस्ट स्टायलिश लुक'...


ऊन, वारा, धूळ, प्रदूषण यांपासून डोळ्यांचे रक्षण करण्याचे काम सनग्लासेस करतात. संरक्षणासोबत गॉगल्स तुम्हाला स्टायलिश आणि डॅशिंग लुक देतात. बाजारात निरनिराळ्या आकाराचे व  रंगीत काचांचे ट्रेंड्स येत असतात, जे तरुणाईला आकर्षित करतात. चेहऱ्याला सूट होणारा गॉगल आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच उठाव देतो. सनग्लासेस निवडताना लेटेस्ट ट्रेंड सोबत आपल्या चेहऱ्याला  काय शोभेल हे बघणेदेखील  महत्त्वाचे आहे. व्यक्तिमत्वाला शोभणारा गॉगल तर हवाचं तसेच कोणत्या प्रसंगी, कोणत्या कपड्यांवर तो शोभेल हे देखील बघणे महत्त्वाचे आहे. 

चला तर जाणून घेऊयात गॉगल्स खरेदी करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी..      

- ऑफिसवेअर, फॉर्मलवेअर , कॅज्युअल वेअर, आउटिंग यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस वापरायला हवेत. 

-कधीही सनग्लासेस वापरून बघितल्याशिवाय खरेदी करू नका. 

- अंडाकृती चेहरा असणाऱ्यांनी ब्रॉड आणि ओव्हरसाईझ फ्रेम वापराव्यात. गोल चेहरा असणाऱ्यांना स्क्वेअर शेप किंवा सेमी राऊंड ग्लासेस छान दिसणार. 

- नेहमी चांगले आणि उत्तम दर्जाचे ग्लासेस वापरा. 

- सनग्लासच्या काचेच्या प्रत्येक रंगामागे विशिष्ट कारण असतो. सभोवतालचे वातावरण, डोळ्यांचे आरोग्य याला अनुसरून काचांची निवड केलेली असते. जाणून घेऊयात काय आहे काचेच्या प्रत्येक रंगाची खासियत- 

पिवळा: बाहेरच वातावरण ढगाळ आणि कंटाळवाणे असेल तर पिवळ्या रंगाचा गॉगल घालावा. 

राखाडी : राखाडी रंग अतिभडक प्रकाशाची तीव्रता डोळ्यांपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून कडक उन्हात राखाडी रंगाचा गॉगल वापरावा.   

तपकिरी: दिवसभर उन्हात काम करायचे असल्यास तपकिरी रंगाचा गॉगल वापरावा. 

हिरवा: हिरवा रंग डोळ्यांना सुखद गारवा प्रदान करतो. त्यामुळे कोणत्याही सीझनमध्ये हिरव्या रंगाचे सनग्लासेस डोळ्यांना गार अनुभूती देतात. 

निळा: निळ्या रंगाचा गॉगल उन्हाचा प्रखरपणा कमी करतो. म्हणजेच निळ्या रंगाच्या गॉगलमध्ये डोळ्यांना उन्हाचा प्रखरपणा जाणवत नाही. 

लाल: लाल रंगाच्या काचा डोळ्यांचा ताण कमी करून व्हिजुअल डेप्थ वाढवतात. रस्ता स्पष्ट दिसण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे हायवेवर प्रवास करताना लाल काचांचे सनग्लासेस वापरावे.  

काळा:दैनंदिन वापरासाठी काळ्या रंगाचा गॉगल उत्तम आहे.