उत्तर प्रदेशमधील 'हे' नयनरम्य ठिकाणं तुम्हाला माहित आहेत का?

   

भारतात असे बरेच ठिकाणं आहेत, जिथे लोक मोठ्या संख्येने दरवर्षी फिरायला जातात. विशेषतः लोक पहाडी भागात जाणे पसंत करतात. कारण तिथे त्यांना निसर्गाची सुंदरता, शांतता आणि सुंदर धबधबे बघायला मिळतात. पण जर आम्ही म्हटलं की झरे तर उत्तर प्रदेशात देखील आहेत... अहो खरंच या लॉकडाउननंतर हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडच्या जागी तुम्ही उत्तर प्रदेशात फिरायला जाण्याचे प्लॅन करू शकता.  कारण इथे असे बरेच धबधबे आहेत, ज्यांना बघतांच निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल. चला तर मग या झऱ्यांबद्दल जरा अधिक माहिती घेऊयात... 

चुना दरी धबधबा   


चुना दरी झरा वाराणसी शक्तीनगर मार्गावर अहरौरा क्षेत्रापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याचे पाणी १६५ फिट उंचावरून वाहते. या झऱ्याची सुंदरता कमाल आहे, असे म्हटले जाते. या धबधब्याच्या पायथ्याशी एक मोठा दगड ठेवण्यात आला आहे, जो येथील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. एकदा इथे गेलात तर नेहमी जायची इच्छा होईल.

तंडा धबधबा 


उत्तर प्रदेशातील मिर्जापूरपासून जवळ जवळ १४ किलोमीटर लांब अंतरावर 'तंडा' धबधबा आहे. मान्सूनमध्ये येथे निरनिराळ्या प्रकारचे जीव आणि वनस्पती बघायला मिळतात. ही जागा शांत आणि अत्यंत नयनरम्य आहे. 

मुक्खा धबधबा 


उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात 'मुक्खा' झरा आहे. दरवर्षी लोक मोठ्या संख्येने येथे फिरायला येत असतात. धबधब्यापासून काही अंतरावर 'सलखन फॉसिल पार्क' देखील आहे, आणि हा जगातील सर्वात पौराणिक असलेला जीवाष्म पार्क आहे. याशिवाय येथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत, तुम्ही तेथे जाऊन दर्शन घेऊ शकता. 

विंधाम झरा


विंधाम झरा मिर्झापूरमध्ये आहे, या धबधब्याचे नाव ब्रिटिश संग्राहक विंधामच्या नावावरून पडले आहे. वाराणसीवरून ९० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. धबधब्याच्या जवळ बरेच पिकनिक स्पॉट आहेत. इथे तुम्ही आपल्या पार्टनरसोबत किंवा कुटुंबासह जाऊ शकता. येथील नैसर्गिक सुंदरता तुम्हाला आकर्षित करते. 
       
  

Previous Post Next Post