अनेक प्रकारच्या केकबद्दल आपण ऐकलेले आहे. आता केकमध्ये बरेचसे नवीन फ्लेवर आलेले आहेत जसे सर्वांच्या आवडीचे ब्लॅक फॉरेस्ट, स्नो फॉरेस्ट, वॅनिला केक, पाईनऍपल केक, रसमलाई केक, बटरस्कॉच केक इ. पण त्यांमध्ये एक गोष्ट सारखी असते. हे सर्व केक चवीने गोड असतात. पण आज आपण गोड नाही तर तिखट चवीच्या केक बद्दल जाणून घेणार आहोत. ज्या लोकांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी मोलाची आहे. चला तर जाणून घेऊयात रव्याचा तिखट केक कसे बनवायचे...
साहित्य:
रवा १ वाटी, हरभरा डाळीचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, लसूण हिरवी मिरची आलं पेस्ट २ चमचे, ताक १ वाटी, मीठ चवीनुसार, साखर १ चमचा, तेल पाव वाटी, खायचा सोडा अर्धा चमचा, ओले खोबरे व कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी- मोहरी, जिरे, हिंग, कधी पत्ता.
कृती:
रवा व हरभरा डाळीचे पीठ ताकामध्ये भिजवून घ्यावे. त्यामध्ये मीठ, साखर, २ चमचे तेल, लसूण, आलं, मिरची पेस्ट, घालून नीट मिक्स करा. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवावे. भांड्याला तेल लावा. मिश्रणात सोडा टाकून मिक्स करून मिश्रण भांड्यात ओतून घ्या. २० ते २५ मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्या. कुकरचे झाकण लावताना शिट्टी काढून घ्या. गार झाल्यावर ओले खोबरे, कोथिंबीर व फोडणी घालून सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खायला सर्व्ह करा.