उन्हाळ्यात डागविरहित त्वचा मिळवण्यासाठी ट्राय करा 'होममेड लिची फेसपॅक'...


उन्हाळ्यात लिचीची विक्री भरपूर होते. रसाळ लिची खाल्ल्यावर उष्णतेमध्ये शरीराला गारवा मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का? लिचीचा उपयोग खाण्यासोबतच आपण चेहऱ्यावर देखील करू शकतो. तुम्ही लिचीचे फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमचा चेहरा नक्की डागविरहित होईल. चला तर जाणून घेऊयात लिचीचे फेसपॅक बनवण्याची विधी आणि फायदे...

ड्राय स्किन आणि सनटॅनसाठी फेसपॅक-

यासाठी लिची पल्पला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटानंतर चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ धून घ्या. हा प्रयोग आठवाड्यातून ३ ते ४दा करा.

सुरकुत्यांसाठी फेसपॅक- 

यासाठी एका वाटीमध्ये एक-एक टेबलस्पून स्मॅश केलेले केळ आणि लिची मिक्स करा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेवर ड्राय होईपर्यंत ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धून घ्या. 


तेलकट त्वचेसाठी फेसपॅक-

लिचीचे फेसपॅक लावल्याने पिंपल्स आणि तेलकट त्वचेमुळे होणाऱ्या पिगमेंटेशनची प्रॉब्लम दूर करता येते. यासाठी लिची जूस आणि  गुलाबजल एकाच प्रमाणात घ्या. या मिश्रणाला कापसाने चेहरा आणि मानेवर लावा. ड्राय झाल्यानंतर पाण्याने चेहरा धून घ्या. 

केसगळती करीता पॅक- 

२ चमचे लिची जूस घ्या, २ चमचे एलो वेरा जूस घ्या. दोन्ही मिक्स करून केसांच्या मुळांवर लावा. हे लावल्यावर मिनिटभर असेच सोडून द्या. त्यानंतर केस शाम्पूने धून घ्या.   

 

   

    

Previous Post Next Post