मेकअप लव्हर्ससाठी 'हे' आहेत 'फ्लॉलेस लुक' देणारे भारतातील सर्वोत्कृष्ट १० मेकअप किट ...



महिला आणि मेकअप यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे, हे तर जगजाहीर आहे. एका मेकअप टचमध्ये इतकी कुशलता असते की, त्यामुळे महिलेचा आत्मविश्वास आणि अभिमान या दोघांचाही स्तर उंचावतो. आणि हातात जर योग्य मेकअप किट असेल तर ती  स्वतःच व्यक्तिमत्व अजून सुंदर बनवू शकते.  तर या लेखात आपण भारतातील सर्वोत्कृष्ट मेकअप किट बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. 

साधारणतः मेकअप किटमध्ये काय काय असावे? 
आपल्या मेकअप किटमध्ये शक्यतो चेहरा, ओठ आणि डोळ्यांसाठी लागणारे सर्व प्रोडक्ट्स असणे गरजेचे आहे. 

फेस प्रोडक्ट्स: मेकअप प्रीप मिस्ट, प्राइमर, कलर-करेक्टिंग कन्सीलर, फाउंडेशन, फेस कन्सीलर, अंडर-आय कन्सीलर, ब्लश, ब्रॉन्झर, हायलाईटर, लूझ पावडर, मेकअप सेटिंग स्प्रे.

आय प्रोडक्ट्स: आयशॅडो प्राइमर, पावडर शॅडो, शॅडो पॅलेट, लिक्विड आयलाइनर, आयलाइनर पेन्सिल, मस्करा, आयलॅश कर्लर, आयब्रो पेन्सिल.

लिप्स प्रोडक्ट्स: लिप बाम, टिन्टेड लिप बाम, लिप लाइनर, क्रीम किंवा सॅटिन लिपस्टिक, मॅट लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक, लिप ग्लॉस.  
 
मेकअप लव्हर्सकरीता भारतातील सर्वोत्कृष्ट १० मेकअप किट्स: 

Sheer Indulgence Makeup Kit by Lakme



कॉस्मेटिक इंडस्ट्री मधील उत्तम ब्रँड असलेला 'लॅक्मे' चा हा मेकअप किट कुठल्याही प्रसंगाकरिता उत्तम आहे. त्याबरोबरच यामुळे तुमच्या त्वचेचीही उत्तम निगा राखली जाते. 
 प्रॉडक्ट्स:  
१ लॅक्मे ग्रेन टी एक्सट्रॅक्ट फेस वॉश(१०० ग्राम), १ लॅक्मे युथ इन्फिनिटी डे क्रीम (५० ग्राम), १ लॅक्मे ऍबसॉल्युट फाऊंडेशन, १ परफेक्ट रेडिअन्स कॉम्पॅक्ट, १ लॅक्मे सिल्क रूट आय कलर, १ फॉरेव्हर सिल्क आयलायनर, १लॅक्मे सॅटिन काजल, २ लीप कलर्स, २ लीप ग्लॉसिस, २ नेल कलर्स, १ नेलपेंट रिमूव्हर.   
किंमत: ९९९ /-

Revlon Complete Makeup Kit


रेवलॉन मेकअप किट ही मेकअप बिगनर्स करता एक योग्य मेकअप किट आहे. कॉलेज असो वा लग्न समारंभ ही किट दोन्ही वेळेकरता उपयुक्त आणि उत्तम आहे. या किटमध्ये सर्व बेस आणि ओठांचे प्रोडक्ट्स आहेत. 
प्रोडक्ट्स:
१ टच अँड ग्लो फॉउंडेशन, १ टच अँड ग्लो ब्लश, २ आयलाईनर पेन्सिल, १ सुपर लस्ट्रॉस लिपस्टिक, १ सुपर लस्ट्रॉस लीप ग्लॉस, १ नेल इनॅमल. 
 किंमत १,९९९/-

Avon Ultimate Mega Mix N Go Palette


विशेषतः आशियामधील सुंदरींसाठी उत्तम दर्जाच्या प्रोडक्टसह 'अवोन'ची ही प्रोफेशनल मेकअप किट आहे 
प्रॉडक्ट्स : 
९ स्पार्कलिंग लीप ग्लोसेस, २४ ड्रीमी आय शॅडोज, २ ब्लँशेस २ हायलाइटर्स. 
किंमत: २,४७५/-

 L’Oreal Paris Glam Me Up Makeup Kit


एक क्विक आणि इझी लुक मिळवण्यासाठी लॉरिअल पॅरिसची ही मेकअप किट उत्तम आहे.  
प्रॉडक्ट्स: 
५ क्युरेट शेड्ससह एक पॅटेट पॅलेट, १ व्हॉल्युम मिलियन मस्करा, १ मॅट रेड लिपस्टिक. 
किंमत: १,८५०/- 

Maybelline New York Dazzling Diva Look



लॉन्ग लास्टिंग मेकअप लुकसाठी 'मेबलिन न्यू यॉर्क'ची ही मेकअप किट उत्तम निवड आहे. 
प्रोडक्ट्स : 
१ मेबलिन न्यू यॉर्क द न्यूड्स आयशॅडो पॅलेट, १ सुपर स्टे मॅट इंक लिपस्टिक, १ फेस स्टुडिओ मास्टर स्ट्रॉबीन्ग स्टिक . 
किंमत: २,२१४/-

 Blue Heaven MTV Muah Pop

तुम्ही एका बजेट फ्रेंडली मेकअप किटच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपला. ब्लु हेवनच्या या मेकअप किटमध्ये मेकओव्हरसाठी तुम्हाला  १७ ब्राईट शेड्स आयटम मिळतील. 
प्रोडक्ट्स: 
१ फॉउंडेशन, ३ आय शॅडो, १ काजळ, १ आय लाइनर, १ मस्करा , ३ लिपस्टिक, २ लीप कलर्स, २ लीप ग्लॉसेस, ३ नेल पॉलिशेस. 
किंमत: ७१९/- 

Miss Claire Makeup Kit



मिस क्लेअर मेकअप किटमुळे स्वतःला परफेक्ट लुक देता येतो. यात बोल्ड आणि आकर्षक कलर्स आहेत. त्याबरोबरच ही किट इनएक्सपेन्सिव्ह आहे.   
प्रोडक्ट्स: 
कॉम्पॅक्ट शेड्स, ब्लश पॅलेट, आय शॅडो, लिप्स शेड, मेकअप ब्रशेस. 
किंमत: ४७५/- 

VOV Prefix Makeup Kit



 बजेट फ्रेंडली आणि हाय कॉलिटी मेकअप सोल्युशनसह VOV प्रीफिक्स मेकअप किट आजच्या युवा पिढीची निवड आहे. 
प्रोडक्ट्स: 
२४ आय शॅडोज, २ ब्लशर, ३ कॉम्पॅक्ट शेड्स, ४ लिप कलर्स. 
किंमत: ६९९/- 

E.L.F. Cosmetics 83 Piece Essential Makeup Kit



E.L.F. च्या या एकाच मेकअप किट मध्ये तुम्हाला ८३ इसेन्शिअल प्रोडक्ट्स मिळतील. तुम्ही जर एका फ्लॉलेस मेकअप किटच्या शोधात असाल तर ही किट सोडू नका.
प्रोडक्ट्स: 
६४ आय शॅडोज, ८ लीप ग्लॉसेस, ४ ब्लशेस, ४ ब्रॉन्झर,१ लीप ब्रश, १ फेस अप्लिकेटर ब्रश, १ आय मेकअप ब्रश. 
किंमत: ४,३७७/- 

Lancome Absolu Voyage Complete Makeup Palette



प्रोडक्ट्स: 
६ आय शॅडो, १ ब्लश, २ लीप कलर्स, १ मस्करा, १ कॉम्पॅक्ट, १ लीप ग्लॉस, २ लीप पेन्सिल, २ लीप कन्सीलर, आय शॅडो ब्रश, लीप ब्रश, ब्लश ब्रश. 
किंमत: २,७८८/- 
 




  
  
Previous Post Next Post