Makeup: जाणून घ्या, परफेक्ट ब्रॉन्झ मेकअप कसा करावा? आणि इतर महत्त्वाच्या टिप्स...

 


जर तुम्हाला तजेलदार, सावल्या रंगाचे आकर्षण वाटत असेल तर असा रंग मिळवण्यासाठी उन्हामध्ये बसण्याची गरज नाही. ब्रॉन्झ मेकअपमुळे तुम्हाला या रंगाचा लुक सहज करता येईल. आजकाल बाजरात ब्रॉन्झ प्रॉडक्ट्स उप्लब्ध आहेत. पण त्यांचा वापर करताना खालील टिप्स नक्की लक्षात ठेवा...

- नेहमी हलकी ब्रॉन्झ शेड निवदा, जी नॅचरल वाटेल. जास्त डार्क रंग खुलून दिसणार नाही. नेहमी आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा केवळ दोन शेड डार्क ब्रॉन्झ मेकअप करा.   

- मेकअप अत्यंत साधा असावा. ब्रॉन्झर्सचा वापर करत असाल तर कॉपर कलरची आयशॅडो किंवा लिपस्टिक वापरणं टाळा. 

- डोळ्यांचा मेकअप करताना ब्राऊन आणि ब्लॅक लाइनर तसेच मस्करा वापरा. 

-डार्क रेड, मरून किंवा किंवा कोरब्सच्या रंगाची लिपस्टिक वापर. जर चेहऱ्याचा विशिष्ट भाग रंगवायचा असेल तर कॉन्ट्रास्ट वापरा. 

- ब्रॉन्झर्सचा वापर करताना फाउंडेशन लावू नका. जर लावयचेच असेल तर एकदम हलका थर लावा. फाउंडेशनच्या अति वापरामुळे चेहऱ्यावरील चमक नाहीशी होते. फाउंडेशन लावायचे असल्यास मॉइश्चरायझरमध्ये मिसळून लावा. 

-ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी पवडर ब्रॉन्झर्स उपयुक्त ठरतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम स्टिक किंवा जेल ब्रॉन्झर्स वापरा. 

- ब्रॉन्झ शेड जरा हलकी करण्यासाठी पिंक किंवा रोझ ब्लश वापरा. 



- पावडर ब्रॉन्झर्स लावण्यासाठी रुंद आणि फ्लफी ब्रश वापरा. सर्वात आधी ब्रश कलरमध्ये बुडवा आणि आपल्या हाताच्या मागच्या बाजूला लावा. यामुळे एक्सट्रा कलर निघून जाईल. आता गाल, कपाळ, हनुवटी, नाकाचा किनारा या भागांवरून ब्रश फिरवा. 

- क्रीम, स्टिक किंवा लिक्विड ब्रॉन्झर्स नेहमी आपल्या बोटांनीच लावा. बोटांवर ब्रॉन्झर्स घ्या आणि मिक्स करा. त्यांनतर गालावर गोलाकारपणे लावा. 

- पहिल्यांदा हलकी शेड लावा आणि मग हळू हळू शेड डार्क करा. जर ब्रॉन्झर जास्त प्रमाणात लागले तर पावडर हलकेच लावा. 

- आजकाल बाजरात मल्टिट्युड ब्रॉन्झर्स मिळतात. त्यांची डार्क आणि लाईट टोन मिक्स केली तर नॅचरल लुक मिळतो. 

- जिथे त्वचेचा रंग डार्क असेल तिथे डार्क शेड वापरा. 

  

Previous Post Next Post