Relationship: पार्टनरसोबत जवळीक वाढवण्यासाठी, वाचा 'या' खास 'रोमँटिक टिप्स'...

 



"दिल का रिश्ता बडा ही प्यारा है, कितना मासूम दिल ये हमारा है..." नाही हो गाणं पूर्ण लिहणार नाही. पण मूड जरा रोमॅंटिक करायला एक रोमँटिक गाणं तर बनतंच. सध्या देशात बऱ्याच भागांमध्ये लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे लोक आता आपापल्या घरातच बंदी आहेत. ही परिस्थिती कपल्सना एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम घालवण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे भरपूर कपल्सचे वर्क फ्रॉम होम सूरु आहे. त्यामुळे कपल्स अधिकतर वेळ घरातच असतात. हीच वेळ आहे आपल्या पार्टनरसोबत जवळीक वाढवण्याची, या  खास 'टिप्स' तुम्हाला पार्टनरसोबत जवळीक वाढवण्यास मदत करतील... 

-पूर्ण आठवड्यातून जेव्हा एक ऑफ मिळतो. तो दिवस सेलिब्रेट करा, म्हणजे लंच किंवा डिनरमध्ये विशेष व्यंजन बनवावे. आपल्या रूमची  सजावट आपल्या पार्टनरच्या आवडीनुसार करा. एखादी छान मुव्ही किंवा शो बघताने जेवण करा. यादरम्यान ऑफिसच्या गोष्टी अजिबात करू नका. 

-विकेंड सोडून प्रत्येक दिवस स्पेशल करायचे असेल तर संध्याकाळी शिफ्ट संपल्यावर सोबत चहा/ कॉफीचा बेत करा. या वेळेत तुम्ही प्रेमाच्या गोष्टी नक्की कराव्यात. 


- पार्टनरसोबत बोलत राहणे आवश्यक आहे. म्हणून पार्टनरसोबत गप्पागोष्टी करत रहा. आताच्या सुद्धा आणि फ्युचर प्लॅनिंग सुद्धा, यामुळे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप राहणार नाही. 

- दोघांचे मूड छान राहावे म्हणून एकमेकांच्या आवडी जपणे, गरजेचे आहे. त्यांच्या आवडीची डिश किंवा एखादं गाणं सुद्धा मूड चिअरफूल करतो. 

- या काळात घरातील कामे सोबत मिळून करा. कुठलीही डोमेस्टिक हेल्प नसल्यास कुणा एकावर कामाचा पूर्ण भार पडू देऊ नका. सोबत काम केल्याने तुमच्या नात्यात समंजसपण आपोआप येईल. एकमेकांच्या गरजांची काळजी घेत राहाल तरंच तुमचे नाते अधिक मजबूत होईल.  

Previous Post Next Post