नक्की वाचा! आपल्या बोटांसाठी सुयोग्य अंगठी कशी निवडावी? यासाठी काही खास टिप्स...



'अंगठी' या छोट्याशा दागिन्याचे  आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. दोन व्यक्तींचे एकमेकांसोबत बंध जोडण्यासाठी अंगठी महत्त्वाची भूमिका बजावत असते, हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे.  एंगेजमेंट रिंग/ वेडिंग रिंग किंवा कॅज्युअल रिंग कशी असावी, याबद्दल बरेच लोक खूप विचार करून ठेवतात. पण काही  खास गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपल्या मनासारखी अंगठी आपल्या बोटांवर असूनसुद्धा ती आपल्याला आवडत नाही. पण यानंतर यासाठी तुम्ही निराश होणार नाही. कारण या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, सुयोग्य अंगठीची निवड कशी करावी? चला तर जाणून घेऊयात अंगठी निवडण्याबद्दल खास टिप्स... 

- जर तुमची बोटं छोटी आणि चपटी असतील, तसेच नखंदेखील चौकोनी आणि चपटी असतील, तर गोल खड्यांची प्लेन अंगठी वापरा. मोठी आणि सिंगल स्टोनवाली अंगठी पण छान दिसेल. पण अंगठी चौकोनी असावी. 

-छोटी आणि बारीक बोटंदेखील लांब दिसतील, जर तुम्ही अंडाकार आणि ओव्हल शेपची अंगठी घातली. मात्र या अंगठीच्या दोन्ही बाजू टोकदार हव्यात. चौकोनी खड्याची अंगठीदेखील शोभेल पण खडा लहान हवा. 


- बोटं आणि नखं लहान असतील तर कोणतीही अंगठी शोभून दिसते. ट्रिपल बॅण्ड असणारी अंगठी विशेष खुलून दिसते. खूप कड्या असणारी व मध्ये मध्ये छोटे स्टोन असणारी अंगठीदेखील छान दिसते. 

- खूप बारीक आणि लांबसडक बोटं असतील तर मोठा चौकोनी खडा किंवा गोलाकार अंगठीदेखील अशा हातावर खुलून दिसते. 

- अंगठी खरेदी करताना मेटल किंवा स्टोनच्या रंगाच्या निवडीबाबत जागरूक रहा. ज्यांच्या हाताची त्वचा पिवळसर आहे त्यांनी शुद्ध सोन्याची अंगठी वापरू नये. अशा हातांवर गोल्ड, प्लॅटिनम, चांदी किंवा हिऱ्याची अंगठी छान दिसेल. 

- ज्यांचे हात गोरे असतात, त्यांनी गोल्ड किंवा प्लॅटिनमची कड्या असणारी अंगठी वापरावी. याशिवाय अशा हातांवर हिरा, माणिक किंवा नीलमची अंगठी शोभते.       

Previous Post Next Post